Kaun Banega Crorepati 15: कौन बनेगा करोडपतीचा 15 (Kaun Banega Crorepati 15) वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अमिताभ बच्चन हा सीझन होस्ट करत आहेत . काही दिवसांपूर्वी KBC 15 या शोला पहिला करोडपती मिळाला. पंजाबचा जसकरण हा केबीसीच्या  15 व्या सीझनचा पहिला करोडपती झाला आहे. मात्र, सात कोटींच्या प्रश्नाचं उत्तर जसकरणला देता आलं नाही. अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या सात कोटींच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहित आहे का?


पंजाबमधून आलेला स्पर्धक जसकरणने एक कोटी रुपये जिंकल्यानंतर शेवटचा प्रश्न म्हणजेच सात कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर  देण्याचा प्रयत्न केला. पण अमिताभ बच्चन यांनी विचारलेला सात कोटींच्या प्रश्नाचं उत्तर त्याला देता आलं नाही.


प्रश्न-पद्मपुराणानुसार कोणत्या राजाला हरणाच्या शापामुळे शंभर वर्षे वाघाच्या रूपात रहावे लागले?


ऑप्शन्स-



  • क्षेमधुरि

  • धर्मदत्त

  • मीताध्वज

  • प्रभंजना






सात कोटींच्या या प्रश्नावर जसकरण  कंफ्यूज झालेला दिसला. तो काही वेळ विचार करत राहिला पण त्याला प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. शेवटी एक कोटी रुपये जिंकल्यानंतर त्याने खेळ सोडायचा निर्णय घेतला. अमिताभ बच्चन यांनी जसकरणला प्रश्न विचारला की, 'तू सात कोटींच्या या प्रश्नाचे उत्तर दिले असते तर काय दिले असते?' जसकरणने याचं उत्तर पर्याय C म्हणजेच मीताध्वज असं सांगतलं. पण हे चुकीचे उत्तर आहे. प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय D म्हणजे प्रभंजना आहे.


एक कोटी जिंकल्यानंतर जसकरण शोमधून बाहेर पडला, बिग बींनी इतर स्पर्धकांसोबत 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट'  हा राऊंड खेळला. हा राऊंड जिंकल्यानंतर अश्विनी कुमार हॉटसीटवर बसले. ते अशा कुटुंबातून आले आहेत ज्यात 23 सदस्य एकाच घरात राहतात.  अश्विनीने 10,000 रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर दिले तेव्हा हूटर वाजला.


अमिताभ बच्चन 2000 मध्ये पहिल्या सीझनपासून कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) हा शो होस्ट करत आहेत. विविध बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावतात. केबीसीची (KBC) सुरुवात 2000 साली झाली. या कार्यक्रमाचे 14 सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले. 


संबंधित बातम्या


KBC 15 : 'कौन बनेगा करोडपती 15'ला मिळाला पहिला करोडपती! 21 वर्षांच्या जसकरणने जिंकले एक कोटी रुपये