Jui Gadkari: अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) ही  सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. जुई ही अनेकवेळा मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर करते. नुकताच जुईनं एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


जुईनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मालिकेच्या सेटवर झोपलेली दिसत आहे. जुईनं या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'दुपारी 2 ते 4  या वेळेतील माझी आवडती गोष्ट. माझ्या सहकलाकार  हे शूट केलं आहे.' जुईनं शेअर कलेल्या व्हिडीओमध्ये एकिकडे जुई आराम करताना दिसत आहे तर दुसरीकडे इतर कलाकार हे चहा पित गप्पा मारताना दिसत आहे. 


जुईनं शेअर केलेल्या व्हिडीओवर लिहिलं आहे,  "दुपारी 2 ते 4 यावेळेत इतर लोक सेट वर काय करतात आणि मी काय करते" जुईनं या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लाफ्टर इमोजींचा वापर केला आहे. 


जुईनं शेअर केलेल्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'दुपारची झोप म्हणजे सुख' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "2-4 झोपते, तू आमच्यासारखी पुणेकर आहेस वाटते."


पाहा व्हिडीओ:



जुई ही सध्या ठरलं तर मग या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जुई गडकरीला पुढचं पाऊल या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच बिग बॉस मराठी या कार्यक्रमामध्ये देखील जुईनं सहभाग घेतला होता.


'ठरलं तर मग' मालिकेला मिळाली प्रेक्षकांची पसंती


जुईची ठरलं तर मग ही प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.या मालिकेमध्ये अमित भानुशाली,चैतन्य सरदेशपांडे , ज्योती चांदेकर हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारतात. या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. जुई ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायली अर्जुन सुभेदार ही भूमिका साकारते. ठरलं तर मग मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Jui Gadkari: ठरलं तर मग फेम जुई गडकरीनं शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, "पुढचं पाऊल आणि..."