Nisha Rawal-Karan Mehra : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) याने नुकत्याच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत आपली  पूर्व पत्नी निशा रावल (Nisha Rawal), तिचा बॉयफ्रेंड आणि कुटुंबियांबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यादरम्यान त्याने निशावर अनेक आरोप केले आहेत. करणने सांगितले की, तो कटाचा शिकार ठरला आहे. निशा तिच्याच मानलेल्या भावासोबत रिलेशनशिपमध्ये असून, दोघेही लिव्ह-इनमध्ये राहत असल्याचा खुलासाही त्याने केला. तसे, आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचेही त्याने म्हटले आहे.


लोकप्रिय टीव्ही मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये ‘नैतिक’ची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेला अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल यांच्यात गेल्या 14 महिन्यांपासून वाद सुरु आहेत. दरम्यान, करण मेहराने निशावर विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोप केले आहेत. करणने गुरुवारी (4 ऑगस्ट) घेतलेल्या पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती दिली. याशिवाय निशा आणि तिचा प्रियकर आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत ​​असल्याचे करणने सांगितले आहे.


मानलेल्या भावासोबतच निशाचं अफेयर


करण मेहराने मीडियाशी बोलताना निशा रावलवर अनेक गंभीर आरोप केले. यावेळी त्याने सांगितले की, निशाचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू आहे. याचा खुलासा करताना तो म्हणाला, ‘रोहित सेठिया नावाचा एक व्यक्ती 14 महिन्यांपासून माझ्या पत्नीसोबत एकाच घरात राहत आहे. या व्यक्तीसोबत निशाचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू आहे. रोहित हा निशाचा मानलेला भाऊ आहे. गेल्या 14 वर्षांपासून निशा त्याला राखी बांधत आहे. मात्र, आता दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. निशाची आई लक्ष्मी रावल यांनाही हे माहीत आहे. निशा रावल, रोहित सेठिया आणि लक्ष्मी रावल यांनी माझ्याविरुद्ध कट रचून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. त्यांनी खोटे आरोप केले, मला घराबाहेर काढले आणि मारहाणही केली.’


मुलाच्या ताब्यावरून वाद सुरु



गेल्या वर्षी निशाने पती करणवर अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला, तेव्हा या जोडप्यामधील भांडण समोर आले होते. दोघांमधील संबंध इतके बिघडले होते की, निशाने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. तसेच, दोघेही आपला मुलगा कविशचा ताबा मिळवण्यासाठी कायदेशीर लढा देत आहेत. निशाने करणवर आरोप करत केस दाखल केली होती. तिने पतीवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोपही लावला होता. ज्यावर प्रतिक्रिया देताना करणने हे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते. दोघांनी गेल्या वर्षी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला असून, मुलाच्या ताब्याबाबत दोघांमध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे. करण-निशा यांनी 2012मध्ये प्रेमविवाह केला होता.


हेही वाचा :


टीव्ही अभिनेता करण मेहरा वादाच्या भोवऱ्यात; पत्नी निशा रावलचा करणवर फसवणुकीचा आरोप


In Pics : घरगुती हिंसा, अटक आणि जामीन ....; ये रिश्ता क्या कहलाता है?