टीव्ही अभिनेता करण मेहरा वादाच्या भोवऱ्यात; पत्नी निशा रावलचा करणवर फसवणुकीचा आरोप

मुंबई : अभिनेता करण मेहराने आपल्याला अनेकदा मारहाण केल्याचा आरोप त्याची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावलने केला आहे. इतकंच नाही तर करणचे विवाहबाह्य संबंध आहेत, असा दावाही तिने केला आहे. संपूर्ण प्रकरणावर माध्यमांशी बोलताना निशाने आपली बाजू मांडली.  

पत्नीला मारहाण केल्याच्या आरोपात टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता करण मेहराला काल (31 मे) अटक करण्यात आली होती. त्याची अभिनेत्री पत्नी निशा रावलने सोमवारी (31 मे) रात्री करण मेहराविरोधात मुंबईत तक्रार दाखल केली. त्यानंतर गोरेगाव पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी करण मेहराला जामीन मिळाला आहे. आपल्याला अडकवण्यासाठी निशा रावलने स्वत:चं डोकं भिंतीवर आपटून घेतल्याचा दावा करण मेहराने केला आहे. आता या प्रकरणात निशा रावलने तिची बाजू मांडली आहे. 14 वर्षांच्या नात्यामध्ये करणने आपल्याला अनेकदा मारहाण केल्याचा आरोप निशाने केला आहे. इतकंच नाही तर करण मेहराचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळेच घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं, असा दावाही तिने केला आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola