Sunil Grover Kapil Sharma Fight in Flight : कॉमेडी किंग म्हणून ओळखला जाणारा कपिल शर्मा (Kapil Sharma) त्याच्या 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मुळे नेहमी चर्चेत असतो. अभिनेता सुनील ग्रोव्हर(Sunil Grover)'द कपिल शर्मा शो' च्या टीमचा भाग होता. त्यावेळी या कार्यक्रमाचे नाव 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' असं होते. पण रिपोर्टनुसार, सुनील आणि कपिलचं भांडण झाल्यामुळे सुनिलनं शो सोडण्याचा निर्णय घेतला. 


2017 मध्ये कॉमेडी नाइट्स विथ कपिलची पूर्ण टीम ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्मनमधून भारतात परत येत होते. मीडिया रिपोर्टनुसार, प्रवास करताना कपिल फ्लाइटमध्ये दारू प्यायला होता. त्यावेळी सुनील आणि कपिल यांच्यामध्ये भांडण झालं. रिपोर्टनुसार वाद सुरू असताना कपिलनं सुनीलला शूज फेकून मारला. त्यामुळे सुनीलनं कपिल सोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अभिनेता सलमान खाननं या दोघांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता.  






23 एप्रिल  2016 रोजी 'द कपिल शर्मा' शोची सुरूवात झाली. अभिनेता सलमान खान या शोचा निर्माता आहे. कपिल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. तर कृष्णा अभिषेक ,भारती सिंह,किकू शारदा,सुमोना चक्रवर्ती हे कलाकार त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. 


संबंधित बातम्या


Gangubai Kathiawadi: 'आ रही है गंगू'; बहुचर्चित गंगूबाई काठियावाडीचं नवा पोस्टर प्रदर्शित


Sunil Grover Heart Surgery : अभिनेता सुनील ग्रोव्हरवर हृदय शस्त्रक्रिया, कॉमेडियनची प्रकृती स्थिर