Jhalak Dikhhla Jaa 10 Winner : 'झलक दिखला जा 10' (Jhalak Dikhhla Jaa 10) या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शोचा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला. गुंजन सिन्हा (Gunjan Sinha) या पर्वाची विजेती ठरली आहे. विशेष बाब म्हणजे गुंजन या प्रर्वाची सर्वात तरुण स्पर्धक होती. 

Continues below advertisement


गुंजनसह रुबिना दिलैक, गश्मीर महाजनी, फैसल शेख, निशांत भट्ट आणि सृती झा हे स्पर्धक अंतिम टप्प्यात पोहोचले होते. पण या सर्व स्पर्धकांना टक्कर देत गुंजनने विजेतेपदाचा मुकुट चढवला. गुंजन या पर्वातील सर्वात लहान स्पर्धक होती. अवघ्या आठ वर्षांच्या गुंजनने 'झलक दिखला जा'चं दहावं पर्व चांगलचं गाजवलं. गुंजनला ट्रॉफीसह 20 लाख रुपयांचे बक्षिस मिळाले आहे. 


गुंजनच या पर्वाची विजेती होणार याचा अंदाज तिच्या चाहत्यांनी आधीच लावला होता. सोशल मीडियावर तिच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. तर दुसरीकडे 'झलक दिखला जा 10'चे चाहते मात्र नाराज झाले. गुंजन एक चांगली डान्सर आहे म्हणूनच तिने हा शो जिंकला. मग आमच्या मतदान करण्याला काय अर्थ आहे. त्यांनी पुन्हा शोमधून मतदान ठेवूच नये, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 






'झलक दिखला जा 10'मध्ये अमृता खानविलकर आणि गश्मीर महाजनी हे मराठमोळे स्पर्धक सहभागी झाले होते. काही दिवसांपूर्वी नृत्यांगना अमृता खानविलकर या कार्यक्रमातून बाद झाल्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. गश्मीर महाजनी हादेखील मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचाही मोठा चाहतावर्ग आहे. 'झलक दिखला जा 10'मधून दोघेही मराठमोळे स्पर्धक बाद झाल्याने चाहते मात्र नाराज झाले.


संबंधित बातम्या 


Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरात एंटरटेन्मेंट क्वीन राखी सावंतची वाइल्ड कार्ड एन्ट्री; विशाल निकम, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथचंही कमबॅक