Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन टीआरपीच्या शर्यतीत मागे पडल्याने या पर्वात नव-नवे ट्विस्ट आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्राच्या तमाम जनतेला बिग बॉस यांनी मोठे सरप्राईझ दिले आहे. बिग बॉस मराठीच्या घरात राखी सावंत, विशाल निकम, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ यांची दमदार एन्ट्री झाली आहे. 


'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वाची चाहूल लागताच एका नावाची आणि एका व्यक्तीची चर्चा खूप होती आणि ती म्हणजे एंटरटेन्मेंट क्वीन राखी सावंत. आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोनंतर घरातील सदस्यांना तसेच प्रेक्षकांना मोठं सरप्राईझ मिळाले. घरात एक नाही दोन नाही तर चार वाइल्ड कार्ड एन्ट्री होताना दिसले आणि यात विशाल निकम, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ आणि राखी सावंत यांची 'बिग बॉस'च्या घरात दमदार एन्ट्री झाली.


आता राखी सोबतच विशाल, मीरा आणि आरोह घरात आल्यानंतर खेळ कसा बदलणार? त्यांना काय स्पेशल पॉवर मिळणार? घरातील नाती किती बदलणार? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. राखी सावंतने या आधी हिंदी 'बिग बॉस'चे सिझन गाजवले आहेत. आता तिच्या येण्याने खेळाला तडका लागणार हे नक्की. घरात आलेले हे चैलेंजर्स घरातील सदस्यांच्या गेमला उलटवून लावणार ? घरात नवे ग्रुप तयार होणार?  हे सगळं हळूहळू कळेलच. 






नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये चारही चैलेंजर्सची एन्टी  झाली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासात प्रथमच येत आहेत चार चैलेंजर्स. राखीची एन्ट्री होताच ती म्हणाली, शेवंते... आणि अपूर्वाला हसू फुटले. पुढे ती म्हणाली, या सर्वांची आई आहे मी बिग बॉसची पहिली बायको... अंड्याची भुर्जी आणि राखी सावंतची मर्जी इथे चालणार..." 


बिग बॉस मराठीच्या घरातून समृद्धी जाधव बाहेर


बिग बॉस मराठीच्या घरातून समृद्धी जाधवला बाहेर पडावे लागले. यंदाच्या पर्वातील बिग बॉसच्या घरातील पहिली कॅप्टन समृद्धी बनली होती. परंतु, आता खेळातून ती बाहेर पडली आहे. पुढच्या आठवड्यात कोण राहील? कोण जाईल? हे ठरवेल त्यांचा गेम. कोण होईल कॅप्टन? कोण होईल नॉमिनेट ? कोण होईल सेफ? याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.


संबंधित बातम्या


Marathi Serial : टीआरपीच्या शर्यतीत 'बिग बॉस मराठी' पडला मागे; 'रंग माझा वेगळा' मालिकेने मारली बाजी