Jhalak Dikhhla Jaa 11 Confirmed Contestants : 'झलक दिखला जा 11' (Jhalak Dikhhla Jaa 11) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या पर्वातील 10 स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. या शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim) पासून शिव ठाकरेपर्यंत (Shiv Thakare) अनेक स्पर्धकांचा समावेश आहे.


'झलक दिखला जा'या कार्यक्रमाचे 10 सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. आतापर्यंत सर्वच स्पर्धकांनी आपल्या नृत्याने सर्वांना वेड लावलं आहे. 'झलक दिखला जा 11' हा कार्यक्रम ऋत्विक धनजानी आणि गौहर खान होस्ट करणार आहेत. 


'झलक दिखला जा 11'मध्ये सहभागी होणार 'हे' स्पर्धक (Jhalak Dikhhla Jaa 11 Confirmed Contestants)


1. शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim) : 'ससुराल सिमर का' फेम अभिनेता शोएब इब्राहिम 'झलक दिखला जा 11'मध्ये आपला जलवा दाखवायला सज्ज आहे. कोरिओग्राफर अनुराधा अय्यंगरसोबत तो थिरकणार आहे.


2. शिव ठाकरे (Shiv Thakare) : रोडीज, बिग बॉस 2, बिग बॉस 13, खतरों के खिलाडी असे अनेक कार्यक्रम गाजवल्यानंतर शिव ठाकरे आता 'झलक दिखला जा 11'मध्ये सहभागी होणार आहे. त्याचा कोरिओग्राफर रोमेश सिंह असेल.


3. उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) : छोट्या पडद्यावरील उर्वशी ढोलकीया 'झलक दिखला जा 11'मध्ये सहभागी होत आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत.


4. आमिर अली (Aamir Ali) : आमिर अली 'झलक दिखला जा 11'च्या मंचावर थिरकायला सज्ज आहे. त्याचा कोरिओग्राफर स्नेहा सिंह असणार आहे.


5. तनीषा मुखर्जी (Tanisha Mukherjee) : बॉलिवूड अभिनेत्री तनीषा मुखर्जी 'झलक दिखला जा 11' या कार्यक्रमाचा भाग असणार आहे. 


6. संगीता फोगाट (Sangeeta Phogat) : संगीता फोगाट 'झलक दिखला जा 11'मध्ये सहभागी होणार आहे.


7. अंजली आनंद (Anjali Anand) : अभिनेत्री अंजली आनंद 'झलक दिखला जा 11' या कार्यक्रमाचा भाग असेल.


8. राघव ठाकुर (Raghav Thakur) : द कपिल शर्मा कार्यक्रमातील विनोदवीर राघव ठाकुर 'झलक दिखला जा 11'मध्ये सहभागी होणार आहे.


9. करुणा पांडे (Karuna Pandey) : अभिनेत्री करुणा पांडे 'झलक दिखला जा 11'मध्ये विवेक चाचेरेसोबत सहभागी होणार आहे.


10. अदरीजा सिन्हा (Adrija Sinha) : अदरीजा सिन्हा 'झलक दिखला जा 11'मध्ये सहभागी होणार आहे.


संबंधित बातम्या


Jhalak Dikhhla Jaa 10 Winner : छोटा पॅकेट बडा धमाका; आठ वर्षांची गुंजन सिन्हा ठरली 'झलक दिखला जा 10'ची विजेती