Karan Johar Judge Jhalak Dikhhla Jaa : छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम 'झलक दिखला जा' (Jhalak Dikhhla Jaa) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता या कार्यक्रमाच्या दहाव्या सीझनला सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत नेहमीच पहिल्या क्रमांकावर होता. या कार्यक्रमात सेलिब्रिटींच्या नृत्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत असते. या कार्यक्रमाचे परिक्षण वेगवेगळे सेलिब्रिटी करत असतात. 'झलक दिखला जा' या कार्यक्रमाच्या दहाव्या पर्वाच्या परिक्षणाची धुरा बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर सांभाळणार आहे. काजोलने या कार्यक्रमाची ऑफर धुडकावली आहे.
तीन सेलिब्रिटी करणार परीक्षण
लवकरच 'झलक दिखला जा' या लोकप्रिय कार्यक्रमाचे दहावे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ई-टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, 'झलक दिखला जा' या कार्यक्रमातचे परिक्षण तीन सेलिब्रिटी करणार आहेत. यात करण जोहर आणि माधुरी दीक्षितच्या नावाचा समावेश आहे. तसेच या कार्यक्रमाच्या परिक्षणासाठी काजोलला विचारणा झाली होती. पण हा कार्यक्रम करण्यास तिने नकार दिला.
बॉलिवूड स्टार माधुरी दीक्षित 2014 पासून 'झलक दिखला जा' या कार्यक्रमाचे परिक्षण करत होती. शाहिद कपूर आणि जॅकलीन फर्मांडीजनेदेखील एका पर्वाचे परिक्षण केलं आहे. 'झलक दिखला जा' हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे परिक्षण माधुरी करत असल्याने चाहते आनंदी झाले आहेत.
संबंधित बातम्या