Koffee With Karan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) कॉफी विथ करण (Koffee With Karan) हा लोकप्रिय टॉक शो नेहमी चर्चेत असतो. या कार्यक्रमाचा सातना सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रोमो पाहिल्यावर असं लक्षात येतं की, बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार या कार्यक्रमाच्या नव्या सिझनमध्ये हजेरी लावणार आहेत. कॉफी विथ करण या शोमध्ये कलाकारांना रॅपीड फायर राऊंड खेळावा लागतो. हा राऊंड जिंकल्यानंतर कलाकारांना एक गिफ्ट हॅम्पर देण्यात येते. या हॅम्परमध्ये नक्की काय असते? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात करणच्या या गिफ्ट हॅम्परबाबत...


काय असतं हॅम्परमध्ये?


करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमधील रॅपीड फायर राऊंड जिंकणाऱ्या सेलिब्रिटीला एक गिफ्ट हॅम्पर दिले जाते. हे हॅप्पर खास असते. या हॅम्परमध्ये पर्सनल रोस्टेड कॉफी, कॉफी फ्रेंच प्रेस, कॉफी मग, ब्राउनी, ब्लूटूथ स्पिकर, आयफोन, होम डेकर वाउचर, हँडमेड साबण, ब्यूटी प्रोडक्ट्स आणि चॉकलेट्स या सर्व वस्तू असतात. 


पाहा कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनचा धमाकेदार प्रोमो:






नवा सिझन असणार खास  
कॉफी विथ करणच्या सातवा सिझनमध्ये रॅपीड फायर राऊंडसोबतच कॉफी बिंगो, मॅश्ड अप हे गेम्स देखील खेळले जाणार आहेत. समंथा, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार, सारा अली खान, कियारा अडवाणी, आलिया भट आणि रणवीर सिंह हे कलाकार कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये सहभागी होणार आहेत. सात जुलै रोजी हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


हेही वाचा: