Comedy Show India’s Laughter Champion : 'द कपिल शर्मा' (The Kapil Sharma Show) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता 'इंडियाज लाफ्टर चॅम्पियन' (India's Laughter Champion) हा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 11 जूनपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाने 'द कपिल शर्मा' (The Kapil Sharma Show) रिप्लेस केले आहे. 'इंडियाज लाफ्टर चॅम्पियन' या कार्यक्रमात पूरन सिंह (Archana Puran Singh) आणि शेखर सुमन (shekhar Suman) परिक्षकाच्या भूमिकेत आहेत.
'इंडियाज लाफ्टर चॅम्पिअन'चे वैशिष्ट्य काय?
‘स्ट्रेस का करने चूरमा, आ रहे हैं कॉमेडी के सुरमा!' अशी 'इंडियाज लाफ्टर चॅम्पियन' या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे. या कॉमेडी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना विनोदाची वेगवेगळी अंग पाहायला मिळणार आहेत. स्टॅंड अप, मिमिक्रीपासून स्किट्स आणि विनोदी कवितांपर्यंत अनेक गोष्टी 'इंडियाज लाफ्टर चॅम्पियन' या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमातील प्रत्येक स्पर्धक या कार्यक्रमातील मानाची ट्रॉफी मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे.
अनेक वर्षांनंतर प्रेक्षकांना 'इंडियाज लाफ्टर चॅम्पियन' सारखा विनोदी कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. राजपाल यादव (Rajpal Yadav) आणि सुगंधा मिश्रा (Sugandha mishra) हेदेखील परिक्षकांना मदत करताना दिसणार आहेत. हा कार्यक्रम वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब करत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. हा कार्यक्रम पुढील तीन महिने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
संबंधित बातम्या