India's Best Dancer 2 Finale : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो इंडियाज बेस्ट डान्सर सिझन 2 (India's Best Dancer 2) चा काल महाअंतिम सोहळा पार पडला. पुण्याची सौम्या कांबळे (Saumya Kamble) ही इंडियाज बेस्ट डान्सर सिझन-2 ची विजेती ठरली आहे. हा शो जिंकल्याबद्दल आज सौम्यावर बक्षिसांचा पाऊस पडला आहे. तिला 15 लाख रूपये आणि एक आलिशान गाडी मिळाली. या शोमधील सौम्याची कोरिओग्राफर असणारी वर्तिकाला देखील सन्मानित करण्यात आले आहे. तसेच शोमधील स्पर्धक गौरव हा रनर-अप ठरला आहे. 


प्रकृती ठिक नसल्याने सैम्या आणि गौरव हे दोघेही महाअंतिम सोहळ्यात त्यांचे नृत्य सादर करू शकले नाही. या दोघांनी व्हिडीओ कॉलद्वारे इंडियाज बेस्ट डान्सर सिझन 2 च्या  महाअंतिम सोहळ्याला हजेरी लावली होती.यावेळी सौम्याची कोरिओग्राफर वर्तिकाला पाच लाख देऊन सन्मानित करण्यात आले.


सौम्याच्या नृत्यशैलीचे अनेक जण कौतुक करत होते. तिला इंडियाज बेस्ट डान्सरची हेलन असं म्हणलं जात होतं. सैम्याने प्रेक्षकांची देखील मनं जिंकली होती. 


या कलाकारांनी महाअंतिम सोहळ्याला लावली हजेरी 


शिल्पा शेट्टी, रॅपर बादशाह आणि मनोज मुंतशिर या कलाकारांनी इंडियाज बेस्ट डान्सर सिझन 2 च्या महाअंतिम सोहळ्याला उपस्थिती लावली होती. तसेच शोचे परीक्षक टेरेंस लुईस आणि गीता कपूर हे देखील उपस्थित होते. तसेच गायक मीका आणि कोरियोग्राफर धर्मेश यांनी देखील महाअंतिम सोहळ्याला हजेरी लावली.


संबंधित बातम्या 


Hrithik Roshan Birthday: 48 व्या वाढदिवसाला ह्रतिकच्या घरात नव्या पाहुण्याची एन्ट्री; खास पोस्ट केली शेअर


Baahubali Fame Kattappa Health: महेश बाबूनंतर बाहुबली फेम कट्टप्पा झाले रूग्णालयात दाखल, काही दिवसांपूर्वीच झालेली कोरोनाची लागण


Katrina Kaif Mangalsutra : कतरिनाच्या मंगळसूत्राची किंमत ऐकून व्हाल थक्क; पाहा काय आहे खास


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha