Baahubai Kattappa Admitted To Hospital : कोरोनाने पुन्हा एकदा देशात दहशत निर्माण करायला सुरुवात केली आहे. सामान्य जनतेपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सगळेच या विळख्यात सापडले आहेत. नुकतीच 'बाहुबली'(Baahubali) फेम कट्टप्पा यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली होती परंतु आता त्यांची तब्येत खालावली असल्या कारणाने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


2015 मध्ये आलेल्या बाहुबली चित्रपटात कट्टपाची भूमिका साकारणारे आणि साऊथचे (South Actor)दिग्गज अभिनेते सत्यराज (Sathyaraj Admitted to Hospital) यांची तब्येत बिघडली असल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोट्सच्या माहितीनुसार 7 जानेवारी रोजी त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीसंबिधित अजून कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नाही. यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कॉरंटिन करण्यात आले होते. ज्या प्रकारे अभिनेता प्रभासने बाहुबली चित्रपटाच्या माध्यमातून लाखोंच्या हृद्यात स्थान बनवलं आहे त्याचप्रमाणे बाहुबलीच्या पात्रानंतर कट्टप्पाच्या पात्राने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 


सत्यराज यांना साऊथ इंडस्ट्रीचे सुपरस्टार मानले जाते. त्यांनी 1978 मध्ये आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी बऱ्याच चित्रपटांत काम केले आहे. परंतु. बाहुबली सिनेमातील कट्टप्पाच्या भूमिकेने त्यांना प्रसिद्धी मिळाली. हिंदी चित्रपट चेन्नई एक्सप्रेसमध्येसुद्धा सत्यराज यांनी दिपिकाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. सत्यराज यांच्याप्रमाणेच साऊथच्या अनेक सुपरस्टार्सना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये कमल हासन, चियान विक्रम. वाडिलेलू , तृषा कृष्णन आणि महेश बाबू यांसारख्या सुपरस्टार्सचा समावेश आहे.


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


[yt][/yt]