Indian Idol: इंडियन आयडॉल (Indian Idol) हा रिअॅलिटी शो जवळपास 20 वर्षांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाचा पहिला सीझन 2004 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सीझनचा फिनाले मार्च 2005 रोजी प्रसारित झाला.  गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) हा इंडियन आयडॉल या शोच्या पहिल्या सीझनचा विजेता ठरला तर अमित साना (Amit Sana) उपविजेता ठरला. पण आता, अमितने आरोप केला आहे की, अभिजीतला जिंकवण्यासाठी फिनालेपूर्वी वोटिंग लाईन बंद केल्या होत्या. अमितच्या या आरोपावर अभिजीतनं प्रतिक्रिया दिली आहे.


काय म्हणाला अभिजीत सावंत? 


इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनचा विजेता अभिजीत सावंतनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, "अमित खूप भोळा आहे. मी अनेक शोमध्ये भाग घेतला आहे. कोणतीही स्पर्धा हरण्याची अनेक कारणे असतात."


अमितचे आरोप फेटाळून अभिजीत म्हणाला की, संपूर्ण भारत दोघांना मत देत होते, त्यामुळे एकाला मते मिळत आहेत आणि दुसऱ्याला नाही, असे होऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर या शोचे निरीक्षण केले जात होते. आता 20 वर्षांनंतर यावर बोलण्यात अर्थ नाही."


अमितचे आरोप


इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीझनचा रनरअप अमित साना याने सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत चॅनलवर आरोप केले होते. वोटिंगच्या पूर्वीच त्यांच्या वोटिंग लाईन्स बंद झाल्याचे त्यांने सांगितले.  इंडियन आयडॉल सीझन 1 या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले 5 मार्च 2005 रोजी प्रसारित झाला होता. हा सीझन फराह खान आणि सोनू निगमने जज केला होता. अभिजीत सावंत,अमित सना,राहुल वैद्य आणि प्राजक्ता शुक्रे हे इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीझनचे फायनलिस्ट होते. 






जाणून घ्या अभिजीत सावंतबद्दल...


इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीझनमुळे अभिजीतला विशेष लोकप्रियता मिळाली. अभिजीत अनेक चित्रपटांमधील गाणी देखील गायली आहेत.  अभिजीत सावंतनं 2009 मध्ये लॉटरी या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आप का अभिजीत सावंत, जुनून, फरीदा, फकीरा हे अभिजीतचे अल्बम्स प्रेक्षकांच्या भेटीला आले.  अभिजीत हा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या गाण्यांची नेटकऱ्यांना माहिती देत असतो.


संबंधित बातम्या:


गाण्यावर फोकस करा, प्रेमप्रकरणांवर नको; इंडियन आयडॉल विजेता अभिजीत सावंतच्या नव्या सीझनला कानपिचक्या