Marathi Serial Updates Hastay Na Hasayalach Pahije Off Air :  छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीची स्पर्धा जोर पकडू लागली आहे. मराठी वाहिन्यांवर नवीन मालिका, शोंचा धडाका सुरू आहे. नव्या मालिकांसाठी सध्या सुरू असलेल्या मालिका ऑफ एअर जात आहे. आता अवघ्या तीन महिन्यापूर्वी कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला कॉमेडी शो 'हसताय ना हसायलाच पाहिजे'ने (Hastay Na Hasayalach Pahije) प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. 


'कलर्स मराठी वाहिनी'वर पुढील आठवड्यापासून 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi Season 5) या रिएलिटी शोचा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या 'बिग बॉस मराठी'च्या सीझनचे होस्टिंग रितेश देशमुख (Riteish Deshmukh) करणार आहे. त्यामुळे या सीझनची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तर, दुसरीकडे अवघ्या तीन महिन्यांपूर्वी आलेल्या  'हसताय ना हसायला पाहिजे'आता ऑफ एअर गेला आहे.     


छोट्या पडद्यावरील झी मराठी वाहिनीवरील कॉमेडी शो 'चला हवा येऊ द्या' ऑफ एअर जाण्याच्या काही दिवस आधीच डॉ. निलेश साबळेने हा शो सोडला होता. त्यानंतर डॉ. निलेश साबळेने कलर्स मराठी वाहिनीवर 'हसताय ना हसायला पाहिजे' हा नवा कॉमेडी शो आणला. या कॉमेडी शोमध्ये भाऊ कदम आणि ओंकार भोजने हेदेखील झळकले.  एप्रिल महिन्याच्या अखेरीस हा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा शो आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.  अचानकपणे हा शो प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याने चर्चांना उधाण आले. तीन महिन्याच्या कालावधीत हळूहळू या शो ला पसंती मिळू लागली होती. मात्र, अचानकपणे हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 






प्रेक्षकांचा निरोप का घेणार?


कलर्स मराठी वाहिनीवर आता 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बिग बॉस मराठी सीझन-5' रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 28 जुलै रोजी या रिएलिटी शोचा प्रीमियर पार पडणार आहे.





बिग बॉस मराठीसाठी काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. 'हसताय ना हसायला पाहिजे' हा कॉमेडी शो ऑफ एअर जाणार असला तरी याचा दुसरा सीझन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा  आहे. बिग बॉस मराठीचे हे पर्व संपल्यानंतर 100 दिवसांनी 'हसताय ना हसायला पाहिजे' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.