Krushna Abhishek Birthday : अभिनेता-कॉमेडियन कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) आज (30 मे) त्याचा 39वा वाढदिवस साजरा करत आहे. लोक त्याला कॉमेडियन, डान्सर, अॅक्टर आणि अँकर म्हणून चांगले ओळखतो. पण, आज पडद्यावर सर्वांना हसवणाऱ्या कृष्णा अभिषेकचे आयुष्य इतके सोपे नव्हते. कृष्णा अभिषेकच्या जन्मानंतर अवघ्या 2 वर्षात त्याच्या आहीचे निधन झाले होते. इथपासून सुरु झालेला त्याचा हा संघर्ष मनोरंजन विश्वात स्थिरावण्यापर्यंत सुरूच होता. इतकेच नाही तर, अभिनेत्याला त्याचे नाव देखील बदलावे लागले होते.


कृष्णाची आई अमिताभ बच्चन यांची खूप मोठी फॅन होती. त्यामुळे जेव्हा बिग बींनी आपल्या मुलाचे नाव अभिषेक ठेवले, तेव्हा कृष्णाच्या आईनेही मुलाचे नाव अभिषेक ठेवले होते. कृष्णा अभिषेकचे खरे नाव अभिषेक शर्मा होते.


का बदलले नाव?


कृष्णा जेव्हा इंडस्ट्रीत आला, तेव्हा त्याला नाव कमवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. मनोरंजन विश्वात आल्यापासून त्याची ओळख केवळ अभिनेता गोविंदाचा पुतण्या इतकीच राहिली होती. तर, दुसरीकडे अभिषेक बच्चन देखील मनोरंजन विश्वात त्याचे स्थान बळकट करत होता. यामुळे कृष्णाला इंडस्ट्रीत स्थान मिळवण्यासाठी नाव बदलावे लागले. कृष्णाने आपल्या संघर्षाने मनोरंजन क्षेत्रात ठसा उमटवला.


सुरुवातीला कॉमेडियनचे नाव ‘Krishna’ असे होते, जे एका प्रसिद्ध ज्योतिषाच्या सल्ल्याने बदलून ‘krushna’ करण्यात आले. कृष्णा अभिषेकने 2017 मध्ये अभिनेत्री कश्मीरा शाहशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले देखील आहेत.


कॅन्सरमुळे गमावले आई-वडील


कृष्णाच्या आईला गर्भाशयाचा कर्करोग होता. यामुळेच त्याच्या जन्मानंतर दोन वर्षातच त्याचे मातृछत्र हरपले. मात्र, याच कर्करोगाने त्याचे पितृछत्रही हिरावून घेतले. कृष्णाच्या वडिलांना देखील कॅन्सर झाला होता. कृष्णा जेव्हा ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ या शोमध्ये काम करत होता, तेव्हा त्याच्या वडिलांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. 8 महिने या आजाराशी सामना केल्यानंतर त्याच्या वडिलांचाही मृत्यू झाला. याचदरम्यान त्याच्यावर कामाचीही मोठी जबाबदारी होती. या जबाबदारीमुळेच वडिलांच्या निधनानंतर काहीच दिवसांत त्याला शूटिंगला परतावे लागले होते.


हेही वाचा :