Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेमध्ये भूमिका साकारणाऱ्या अनेक कलाकारांना घराघरांत प्रसिद्धी मिळाली. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील सोढीची भूमिका साकारणाऱ्या गुरुचरण सिंह यांनाही या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. तारक मेहता फेम गुरुचरण सिंह उर्फ सोढी यांनी आता मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केला आहे.


तारक मेहता फेम सोढीचा निर्मात्यांवर गंभीर आरोप


गुरुचरण सिंह यांची जागा नवीन सोढीने घेतल्यानंतर चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत होतं. सोढीची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेले गुरुचरण सिंह पुन्हा एकदा तारक मेहता का उल्टा चष्मा शोमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, आता वर्षांनंतर अभिनेत्याने उघड केलं आहे की, त्यांना अचानक शोमधून बाहेर फेकण्यात आलं होतं. काहीही न सांगताच मालिकेमधून काढण्यात आल्याचा गंभीर आरोप गुरुचरण सिंह यांनी मालिकेच्या निर्मात्यांवर केला आहे.


'काहीही न सांगताच मालिकेमधून बाहेर फेकलं'


सोढीची भूमिका करून घराघरात प्रसिद्ध झालेला गुरुचरण सिंह हे सुरुवातीपासूनच या तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचा एक महत्त्वाचा भाग राहिले आहेत. गुरुचरण सिंह यांनी  2012 मध्ये अचानक मालिका सोडली होती. सोढीची भूमिका चाहत्यांच्या मनात घर करुन गेली होती. त्यामुळे, चाहत्यांच्या मागणीनुसार निर्मात्यांनी त्यांनी पुन्हा शोमध्ये बोलावलं. यानंतर 2020 मध्ये गुरुचरण सिंह यांनी या शोला कायमचा निरोप दिला. यावर आता अभिनेत्याने उघडपणे वक्तव्य केलं आहे.


मुलाखतीत गुरुचरण सिंह यांचा खुलासा


अलिकडेच सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत गुरुचरण सिंह यांनी सांगितलं की, त्यांना न सांगता तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमधून काढून टाकण्यात आलं. त्यांनी पुढे म्हटलं की, 'तारक मेहता' मालिका माझ्यासाठी कुटुंबासारखा आहे. मी त्यांना माझे कुटुंब मानलं नसतं तर, मी अनेक गोष्टी बोलू शकलो असतो. 2012 मध्ये मी शो सोडला नाही, मला बाहेर फेकलं गेलं.


"टीव्हीवर नवीन सोढी पाहून मला धक्काच बसला"


गुरुचरण सिंग पुढे म्हणाले, 'त्यावेळी तारक मेहताच्या निर्मात्यांसोबत माझ्या काही कॉन्ट्रॅक्ट्सबाबत चर्चा सुरू होती. पण तो माझी जागा घेणार आहे, असं मला सांगण्यात आलं नव्हतं. मी त्यांना त्यापूर्वी फी वाढवण्यास सांगितलं होतं. मी दिल्लीत होतो आणि कुटुंबासोबत बसून टीव्हीवर शो पाहत होतो. कारण त्या एपिसोडमध्ये धरमजी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. याच एपिसोडमध्ये प्रेक्षकांना नवीन सोढीची ओळख करुन देण्यात आली. त्याला पाहून मला धक्काच बसला.


गुरुचरण सिंह म्हणाले, 'मी शो सोडला नव्हता'


टीव्हीवर सोढीच्या भूमिकेत दुसऱ्या व्यक्तीला पाहिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती, याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. गुरुचरण सिंग यांनी सांगितलं की, 'मी जेव्हा त्याला (दुसऱ्या सोढीला) पाहिलं तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं. माझी जागा घेतल्यानंतर त्याच्यावर खूप दबाव होता. माझ्यावरही प्रेक्षकांचा खूप दबाव होता. लोक मला वारंवार विचारायचे की तू शो का सोडलास? पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिलाही अशाच प्रकारे शोमधून बाहेर काढण्यात आल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.




महत्त्वाच्या इतर बातम्या :


'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील सर्वात महागडा कलाकार जेठालाल, मुनमुन दत्ताची फी किती?