मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा टीव्ही शो अनेक वर्षांपासून मनोरंजन करत प्रेक्षकांची मने जिंकत आहे. आजही चाहते या कार्यक्रमावर तितकंच प्रेम करतात. चाहते शोमधील प्रत्येक मनोरंजक ट्विस्ट आणि टर्नचा आनंद घेतात. या शोचे प्रत्येक पात्र आपापल्या परीने सर्वोत्कृष्ट असून त्यांनी प्रेक्षकांना अक्षरक्ष: वेड लावलं आहे. मालिकेतील दिलीप जोशी, मुनमुन दत्ता, श्याम पाठक आणि अमित भट्ट या कलाकारांनी चाहत्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दरम्यान, यासाठी हे कलाकार भरमसाठ मानधनदेखील घेतात. या शोचे मुख्य भूमिकेतील कलाकार प्रत्येक एपिसोडसाठी किती पैसे घेतात हे जाणून घ्या.
दिलीप जोशी
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील जेठालालची मुख्य भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशीच्या एका एपिसोडची फी खूप जास्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दिलीप जोशी प्रत्येक एपिसोडसाठी सुमारे 1.5 ते 2 लाख रुपये फी आकारतात. तो या शोचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे.
मुनमुन दत्ता
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ता ही घराघरात पोहोचली आहे. प्रेक्षकांनी बबीताच्या भूमिकेला खूप प्रेम दिलं आहे, त्यामुळेच ती इतक्या वर्षांनंतरही शोमध्ये कायम आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुनमुन दत्ता एका एपिसोडसाठी 50,000 ते 75,000 रुपये मानधन घेते.
अमित भट्ट
शोमध्ये बापूजी म्हणजेच चंपक लाल गडा यांची भूमिका करणारा अभिनेता म्हणजे अमित भट्ट. जेठालाल आणि दयासोबत अमितचीही महत्त्वाची भूमिका आहे, त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे. अमित भट्ट एका एपिसोडसाठी 70,000 रुपये घेतो. या शोमध्ये
श्याम पाठक
'तारक मेहता का उल्टा चष्मा' शोमध्ये पत्रकार पोपटलालची भूमिका करणारा अभिनेता श्याम पाठक. तो या शोमध्ये नेहमी लग्नासाठी मुलीच्या शोधात असतो आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. श्याम पाठक एका एपिसोडसाठी 60,000 रुपये घेतो.
मंदार चांदवडकर
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही शोमध्ये आत्माराम भिडे यांची भूमिका मंदार चांदवडकर साकारत आहे. मंदार चांदवडकर प्रत्येक एपिसोडलाठी 80,000 रुपये मानधन घेतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी की अभिजीत सावंत, बिग बॉसच्या घरातील सर्वात महागडा स्पर्धक कोण?