Gunaratna Sadavarte :  गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी बिग बॉसच्या घरात (Bigg Boss 18) एन्ट्री केल्यानंतर हायकोर्टाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. असं असतानाच आता गुणरत्न सदावर्ते यांची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाल्याची मोठी अपडेटही समोर येतेय. मराठा आरक्षणाचा महत्त्वाची सुनावणी सुरु असताना गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतली. त्यावरुन हायकोर्टाने त्यांना चांगलच सुनावलं आहे. 


दरम्यान सोशल मीडियावर सध्या गुणरत्न सदावर्ते यांची एक्झिट झाली असल्याच्या चर्चा आहेत. अनेक पोस्टही या संदर्भात व्हायरल होताय. त्यामध्ये एका केसच्या संदर्भात सदावर्ते हे बिग बॉसच्या घराबाहेर पडले असल्याचं सांगण्यात येत आहे. पण सदावर्ते नेमकं कोणत्या कारणासाठी घराबाहेर पडले आहेत, हे कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये. 


सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल


दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांच्या एक्झिटच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत. त्यामध्ये सदावर्ते हे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले असल्याचं सांगण्यात येतंय. तसेच एका केससाठी ते बाहेर पडले असल्याची माहिती समोर आलीये.त्यामुळे बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसांपासून मनोरंजन करणारे गुणरत्न सदावर्ते आता बिग बॉसच्या घरात दिसणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. 


सदावर्ते बिग बॉसच्या घरात पुन्हा येणार?


दरम्यान मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी सदावर्तेंना सध्या घरातून बाहेर पडावं लागलं असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे ही सुनावणी झाल्यास गुणरत्न सदावर्ते हे पुन्हा बिग बॉसच्या घरात येऊ शकतात, असंही म्हटलं जातंय. 


गुणरत्न सदावर्तेंच्या एन्ट्रीवर हायकोर्टाची नाराजी


डॉ. गुणरत्न सदावर्तेंच्या वर्तनावर हायकोर्टाची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "मराठा आरक्षणाची इतकी महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू असताना सदावर्ते बिग बॉसमध्ये जाऊन बसलेत", अशी माहिती इतर वकिलांकडून हायकोर्टाला देण्यात आलीये. या प्रकरणातील मूळ याचिकाकर्त्यांना प्रकरणाचं गांभीर्यचं नाही का? असा सवाल उपस्थित करत आपली याचिका सर्वात आधी घ्या म्हणून सदावर्ते आमच्यापुढे विनंती करत होते असं हायकोर्टाने म्हटलं आहे. आता युक्तिवाद करण्याची वेळ आली तर तेच गायब झाले? असाही सवाल हायकोर्टाने केलाय. 


मराठा आरक्षणाला विरोध करणा-या सर्व याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद संपला, आता कुणालाही युक्तिवाद करण्याची संधी मिळणार नाही, असं हायकोर्टाने म्हटलं आहे. पुढील सुनावणीत राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ युक्तिवाद करणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील प्रकरणाची हायकोर्टातील पूर्णपीठापुढील सुनावणी 19 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आलीये.










ही बातमी वाचा : 


Gunaratna Sadavarte : मोठी बातमी : मराठा आरक्षणाची इतकी महत्त्वाची सुनावणी, तुम्ही बिग बॉसमध्ये जाऊन बसलात? हायकोर्टाने गुणरत्न सदावर्तेंना सुनावलं