Gopi Bahu Act In Bengaluru : साथ निभाना साथिया (Saath Nibhaana Saathiya) या मालिकेतील गोपी बहु या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. मालिकेतील गोपी बहुचा लॅपटॉप धुवायचा सिन पाहिल्यावर आजही अनेकांना हसु येते. पण गोपी बहुने केलेलं हे कृत्य आता बंगळुरूमधील (Bengaluru) एका महिलेनं केलं आहे. त्या महिलेने डिटर्जंटचा वापर करून चक्क पतीचा लॅपटॉप धुतला.  महिलेच्या या वागण्याने पतीने तिच्यासोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
बंगळुरूमधील  आर टी नगर येथे राहणाऱ्या या जोडप्याने 2009 मध्ये लग्नगाठ बांधली. महिलेचा पती आयटी कंपनीमध्ये काम करतो. लग्नानंतर ते दोघे इंग्लंडला गेले. त्या महिलेला स्वच्छतेची खूप आवड होती.  बंगळुरू सिटी पोलीस वरिष्ठ काउंसल बीएस सरस्वती यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दोन वर्षांनी त्यांच्या घरी बाळ जन्माला आले. त्यानंतर परिस्थिती बिघडू लागली पतीला शूज, कपडे, मोबाईल साफ करण्यास पत्नी भाग पाडत होती.'


एवढंच नाही तर त्या महिलेने सासूच्या निधनानंतर पतीला आणि मुलांना 30 दिवस घराबाहेर ठेवले. त्यांच्या समुपदेशकांनी दिलेल्या माहितीनुसार, 'लॉकडाऊन दरम्यान, पती घरून काम करत होता  त्यावेळी त्याच्या पचत्नीने कामाचा लॅपटॉप आणि स्मार्टफोन धुतले. त्यामुळे पतीला धक्का बसला. पतीने सांगितले की ती दिवसातून सहापेक्षा जास्त वेळा आंघोळ करते आणि तिच्या आंघोळीचा साबण स्वच्छ करण्यासाठी एक विशेष साबण देखील तिने ठेवला.' पत्नीच्या वागण्यामुळे पती कंटाळून मुलांसह त्याच्या पालकांच्या घरी राहिला गेला. पत्नीने मात्र तिचे हे वागणे सामान्य असल्याचे सांगितले आहे. पत्नीने पती विरोधात छळ केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.    


संबंधित बातम्या


TRP Report : बड्या पडद्यावरचे सुपरस्टार छोट्या पडद्यावर फेल! अमिताभ, सलमान, रणवीरचा एकही शो टॉप टेनमध्ये नाही


Gadar 2 : तारा सिंह आणि सकिनाची जोडी पुन्हा येतेय, शूटिंगचे फोटो व्हायरल