Girija Prabhu :  ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’असा प्रश्न  अनेकांना पडतो. अनेकजण आपल्या परीने त्याची उत्तरे शोधतात. मात्र, स्वप्नांचे शहर म्हटले जाणाऱ्या मुंबईत हक्काचे घर असणे हेदेखील अनेकांचे स्वप्न असते. ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री गिरीजा प्रभूने (Girija Prabhu) मुंबईत आपले हक्काचे घर घेतले आहे. अवघ्या 24 व्या वर्षीने तिने मुंबईत घर घेतल्याने चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 


गिरीजा सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. आपल्या कामासंबंधीचे अपडेट्स  ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना देते. इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत गिरीजाने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. यावेळी तिने काही फोटो शेअर्स केले आहेत. गिरीजाने नव्या घराच्या दारावर लावलेली खणाची डिझाइन असलेल्या नेमप्लेटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. काही महिन्यापूर्वी गिरीजाने घराचा ताबा घेतला होता. त्यानंतर घरात छोटी पूजा करत गृहप्रवेश केला.  


 






नेमप्लेटवर खणावर ‘गिरीजा प्रभू’ हे नाव लिहिण्यात आलं आहे. याशिवाय नेमप्लेटला खालील बाजूने घुंगरांची आकर्षक डिझाइन करण्यात आलेली आहे. गिरीजाने गृहप्रवेशासाठीची एक लहानशी पूजा पार पाडली. काही महिन्यापूर्वी गिरीजाने घराची नोंदणी केल्यानंतरचे फोटो शेअर केले होते. 






..