Gaur Gopal Das In Chala Hawa Yeu Dya : छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. या मंचावर मनोरंजनसृष्टीतील मंडळीसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळीदेखील हजेरी लावत असतात. आता या कार्यक्रमाच्या आगामी भागात मोटिव्हेशनल गुरु गौर गोपाल दास (Gaur Gopal Das) येणार आहेत. 


गुरु गौर गोपाल दास विशेष भाग कधी पाहायला मिळेल? 


'चला हवा येऊ द्या'च्या आगामी भागात गौर गोपाल दास हजेरी लावणार आहेत. झी मराठीने नुकताच सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. यात गौर गोपाल दास यांचा विनोदी अंदाज पाहायला मिळत आहे. थुकरटवाडीत गप्पा रंगणार 'गौर गोपाल दास' यांच्यासोबत, असं म्हणत झी मराठीने हा प्रोमो शेअर केला आहे. हा विशेष भाग प्रेक्षकांना येत्या सोमवारी 1 मेला रात्री 9.30 वाजता पाहायला मिळणार आहे. 


गौर गोपाल दास सोशल मीडिया किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपले प्रेरणादायी विचार मांडत असतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर आपलं आयुष्य खूप सुंदर आहे हे सांगताना गौर गोपाल दास प्रेक्षकांना खळखळून हसवत बोधदेखील देतील. 






गौर गोपाल दास यांच्या सारखं दिग्गज व्यक्तीमत्त्व 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर हजेरी लावणार असल्याने प्रेक्षकांना या कार्यक्रमाची उत्सुकता आहे. नुकतचं या भागाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. कुशल बद्रिकेने गौर गोपाल दास यांचा एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"आपण माणसांवर प्रेम करतो. आपल्याला माणसांची सवय होते. पण, समोरची व्यक्ती त्या लायक नसेल तर? माझ्या आयुष्यातल्या 90% लोकांचा हा प्रॉब्लम आहे आणि मी सुद्धा त्या 90% लोकांमध्ये येतो".


गौर गोपाल दास कोण आहेत? (Who Is Gaur Gopal Das)


गौर गोपाल दास हे मोटिव्हेशनल गुरु आहेत. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. महाराष्ट्रात जन्मलेल्या गौर गोपाल दास यांचं शिक्षण पुण्यात झालं आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियरींगमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एका मोठ्या आयटी कंपनीमध्ये नोकरी केली. पण मन न रमल्यामुळे त्यांनी अध्यात्माचा मार्ग निवडला. 


संबंधित बातम्या


Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या' मंचावर भरलीये कडक शिस्तीची 'जाम पंचायत'; प्रोमो पाहून खळखळून हसाल