मुबंई : सोनी टीव्हीवरील 'बेहद' मालिकेच्या सेटला शूटिंगदरम्यान मोठी आग लागली. मुख्य भूमिका साकारणारा कुशल टंडन जखमी झाला आहे. पण त्याने एखाद्या हिरोप्रमाणेच अभिनेत्री जेनिफर विंगेटला आगीतून वाचवलं.


कशी लागली आग?

मालिकेत लग्नाचा सीक्वेन्सचं शूटिंग सुरु होता. कथेनुसार लग्नाच्या या सीनमध्ये आग लागणार होती. त्याप्रमाणे आग लागली. पण अचानकच आग पसरत गेली आणि तिथे एकच गोंधळ उडाला.

आग पसरल्याचं लक्षात येताच पहिल्यांदा कुशल टंडन पळून गेला. पण जेनिफर विंगेट तिथेच असल्याचं दिसल्यावर तो पुन्हा तिथे गेला आणि जेनिफरला वाचवलं.

कुशलने ट्वीट करुन शुभचिंतक आणि चाहत्यांचे प्रार्थनांसाठी आभार मानले. मात्र मान आणि पायाला दुखापत झाल्याचंही त्याने सांगितलं.



अॅक्शन डायरेक्टरविरोधात कुशलची नाराजी

कुशल टंडनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन मालिकेच्या अॅक्शन डायरेक्टरांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कुशलने लिहिलं आहे की, "जे झालं ते एखाद्या सीनसारखं असल्याचं मला वाटत होतं, पण ते प्रत्यक्षात घडलं. ज्याप्रकारे मी दुसऱ्यांदा आगीच्या ठिकाणी गेलो...घरी जाताना हा व्हिडीओ पाहून मला हसू येत होतं. पण ते अतिशय भीतीदायक होतं. मला कळलंच नाही, त्यावेळी माझ्या डोक्यात काय सुरु होतं. असे सीन चित्रित करताना सुरक्षेची काळजी घेणं हे अॅक्शन दिग्दर्शकाचं काम होतं. त्या मुलीला वाचवण्यासाठी तिथे एकही अॅक्शन डायरेक्टर आला नाही. मी देवाचे आभार मानतो, त्यावेळी तिला वाचवण्याचं बळ मला दिलं."

पाहा व्हिडीओ