Bigg Boss 18: सध्या बिगबॉस 18 हा रिलॅलिटी शो प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरलाय, विवियन डिसेना टाईम गॉड झाल्यापासून घरातल्यांचा नूर पालटला आहे. दरम्यान, बुधवारच्या एपिसोडमध्ये होणाऱ्या टास्कमध्ये विवियन डिसेना, अविनाश मिश्रा आणि रजत दलाल यांची हातापायी होणार असल्याचं नुकत्याच एका प्रोमोमधून समोर आले आहे. ही लढाई एका टास्कमध्ये झाली. दुसरीकडे लाइफ कोच अरफीन खानची पत्नी साराचं मेंटल ब्रेकडाऊन होताना दिसलं. ती उठून सामान फेकताना दिसल्यानं तिला आवरणंही कठीण झाल्याचं दिसलं.
कलर्सटीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये विवयन डिसेनाकडून टाईम गॉडचा किताब काढून घेण्याची वेळ आली आहे. यासाठी करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकरही जोर लावताना दिसत आहे. घरातल्या स्पर्धकांना A आणि B टीममध्ये विभागण्यात आले आहे. जी टीम जिंकेल त्या टीममधील एका सदस्याला आठवडाभरासाठी टाईमगॉड किताब मिळणार आहे.
रजतला विवियने खाली आपटले
या टास्कमध्ये विवियन डिसेना आणि अविनाश मिश्रा व रजत दलाल यांच्यात शारिरिक फाईट झाल्याचं पहायला मिळालं. या प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे विवियन आणि अविनाशने मिळून रजतला जमीनीवर आपटल्याचं दिसत आहे. आता खरी हकीकत काय हे आजच्या एपिसोडमध्येच दिसणार आहे.
साराचं मेंटल ब्रेकडाऊन झालं
एकीकडे रजत, विवियन अविनाशची फाईट तर दुसरीकडे आरफीन खानची पत्नी साराचं मेंटल ब्रेकडाऊन झाल्याचं दिसलं. ती अचानक रडायला लागते. किंचाळत ओरडत वस्तू फेकायला लागते. तिच्या पतीला ती या शोमध्ये तिला रहायचं नसल्याचं ती सांगते. घरातले सदस्य तिला आवरण्याचा, समजावून सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतायत. पण ती कोणाचंही ऐकत नसल्याचं दिसून येत आहे.
चार सदस्य झाले नॉमिनेट
या आठवड्यात घराबाहेर जाण्याची टांगती तलवार चार सदस्यांवर आहे. यात आरफीन खान, ताजिंदर सिंह बग्गा, चाहत पांडे आणि सारा आरफीन खान यांचा समावेश आहे.