Ankit Gupta Birthday: आपल्या लुक्ससाठी ओळखला जाणारा अंकित गुप्ता 'बिग बॉस 16' मधून खूप प्रसिद्ध झाला आहे. 'उदारियां'मधील त्याच्या अभिनयामुळे त्याचे लाखो चाहते आहेत. अंकित गुप्ता यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९८८ रोजी झाला. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मेरठ येथे झाला.'बिग बॉस 16' फेम अंकित गुप्ताचे अनेक चाहते आहेत. अंकितच्या अभिनय प्रवासाची कहाणी भन्नाट आहे! कोणत्याही पात्राचे बारकावे आणि गुंतागुंत अंगीकारून त्याने विविध भूमिकांना न्याय दिला आहे. त्याच्या दमदार ॲक्टिंग कौशल्याचं आणि जबरदस्त परफॉर्मन्सचं प्रेक्षकांकडून कायमच कौतूक होत असतं.


ट्यूशन शिकवत मॉडेलिंग करायचा 


मेरठमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही पैसे कमाण्यासाठी त्याने ट्युशन  घेण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी कॉल सेंटरमध्येही काम केले. शेवटी मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्याचे त्याने ठरवले आणि ते करण्यासाठी दिल्लीला आला. पुढे मुंबईत येऊन अभिनयात पाऊल टाकले.


'बालिका वधू'मधून मिळाली प्रसिद्धी


त्याने 2012 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यावेळी टिव्ही वर  'बालिका वधू' ही हित मालिका होती.  या हिट टीव्ही मालिकेत डॉ. अभिषेक कुमार म्हणून पदार्पण केले. चॅनल V च्या 'सद्दा हक' मधील पार्थ कश्यपच्या भूमिकेमुळे तो तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध झाला.नंतर 'उदारियां', 'बेगुसराय', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'मायावी मलिंग' आणि 'कुंडली भाग्य' यांसारख्या टीव्ही शोमध्येही तो दिसला. 'सद्दा हक: माय लाइफ, माय चॉईस', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', आणि 'उडान' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये त्याच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळवत, अंकितने आपलं स्थान पक्कं केलं आहे.


अंकित गुप्ताची एकूण संपत्ती किती आहे?


अंकित गुप्ताच्या कमाई म्हणजे त्याची अभिनय कारकीर्द आणि सोशल मीडिया. जवळपास 10 वर्षे अभिनेता म्हणून काम करताना त्याचा करिअरचा आलेख चांगला आहे. टेलिव्हिजनवरील मालिका आणि रियालिटी शो करत त्याची एकूण संपत्ती सुमारे 10 कोटी रुपये आहे.