मुंबई : ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेली कॉमेडियन भारती आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांच्या जामीन अर्जावर आज एनडीपीएस कोर्टात सुनावणी पार पडणार होती. परंतु, सरकारी वकील अतुल सरपांडे सेशन कोर्टाच्या दोन वेगवेगळ्या सुनावण्यांमध्ये व्यस्त होते. ज्यामुळे ते एनसीबीची बाजू मांडू शकणार नाहीत. त्यामुळे एनसीबीच्या अधिकारी कोर्टाकडे भारती आणि हर्षच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी करण्याची विनंती केली होती. त्यामुळे दोघांच्याही जामीन अर्जावरील आजची सुनावणी टळली असून भारती आणि तिचा पतीन हर्षला आजची रात्रही तुरुंगात काढावी लागणार आहे. उद्या याप्रकरणाची सुनावणी करण्यात येणार आहे.
कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरात गांजा सापडल्यानंतर दोघांनाही प्रथम एनसीबीने ताब्यात घेतलं. चौकशीनंतर भारती सिंह हिला अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ तब्बल 18 तासांच्या चौकशीनंतर हर्ष लिंबाचिया यालाही अटक करण्यात आली. काल दोघांनाही मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांनाही मुंबईच्या किल्ला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर दोघांनीही जामीनासाठी अर्ज केला होता. आज दोघांच्याही जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. परंतु, आजची सुनावणी टळली असून दोघांनाही आजची रात्र भायखळा तुरुंगातच काढावी लागणार आहे.
दोघांच्या घरातून 86.5 ग्रॅम गांजा जप्त
घरात गांजा सापडल्यानंतर दोघांनाही प्रथम एनसीबीने ताब्यात घेतले. चौकशीनंतर भारती सिंह हिला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी एक ड्रग पॅडलरला पकडण्यात आले. त्याच्या चौकशीनंतर आज भारती आणि हर्षच्या घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात दोघांच्या घरात 86.5 ग्रॅम गांजा सापडला. या जप्तीनंतर दोघांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आले.
भारती आणि हर्ष यांनी गांजा घेत असल्याचे कबूल केलं - सुत्र
भारती आणि हर्ष या दोघांचीही स्वतंत्र खोल्यांमध्ये बसून चौकशी केली गेली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती हिची चौकशी केली असता तिने गांजा सेवन केल्याची कबुली दिली. हर्षही एकत्र गांजा सेवन करायचा.
कोण आहे भारती सिंह?
भारती सिंह ही स्टॅण्डअप कॉमेडियन आणि अभिनेत्री आहे. सध्या ती 'द कपिल शर्मा शो'मध्ये काम करत आहे. भारतीने 2017 मध्ये लेखक हर्ष लिंबचियासोबत लग्न केलं. तिने आपल्या कारकीर्दीची सुरुवात 'इंडियन लाफ्टर चॅलेन्ज'मधून केली होती. यानंतर तिने अनेक कॉमेडी शोमध्ये काम केला. यामध्ये कॉमेडी सर्कस, कॉमेडी सर्कस महासंग्राम, कॉमेडी सर्कस का जादू, कहानी कॉमेडी सर्कस की आणि कॉमेडी नाईट्स बचाओ यांचा समावेश आहे.
दरम्यान, बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीपासून याची सुरुवात झाली आणि त्यानंतर दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, अर्जुन रामपाल, त्याची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांच्यासह अनेक नावं समोर आली आणि त्यांची चौकशीही झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :