Women Like Her : डिस्कव्हरी (Discovery) चॅनलच्या माध्यमातून अनेक दर्जेदार कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. लवकरच 'वुमन लाइक हर' (Women Like Her) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना चार महिलांचा रोमांचक प्रवास जाणून घेता येणार आहे.
अलंकृता श्रीवास्तव (Alankrita Shrivastava), मलिका सदानी (Malika Sadani), हीना सिंधू (Heena Sindhu) आणि श्रुती संचेती (Shruti Sancheti) या जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या महिलांचा रोमांचक प्रवास 'वुमन लाइक हर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहे. अलंकृता, मलिका, हीना, श्रुती या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान स्त्रिया आहेत.
27 जूनला डिस्कव्हरीवर होणार प्रीमियर
'वुमन लाइक हर' या कार्यक्रमाचा प्रीमियर 27 जूनला डिस्कव्हरीवर होणार आहे. चार विविध क्षेत्रातील महिलांच्या प्रेरणादायी कथा प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करतील. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाची नव्याने ओळख प्रेक्षकांना होणार आहे. डिस्कव्हरीवर 27 जूनला संध्याकाळी 5:21 ला या कार्यक्रमाचा प्रीमियर होणार आहे.
श्रुती सेठ 'वुमन लाइक हर' या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. सिने-निर्माती आणि पटकथा लेखक अलंकृता श्रीवास्तव यांनी 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' आणि 'डॉली किट्टी और वो चमकते सितारे' अशा सिनेमांचे दिग्दर्शन केलं आहे. मलिका सदानी या 'द मॉम्स' कंपनीच्या संस्थापक आहेत. हीना सिंधूने तिच्या खेळाने लोकप्रियता मिळवली आहे. तर श्रुती संचेती एक फॅशन डिझायनर आहे.
संबंधित बातम्या