Dance Deewane Junior : 'डान्स दीवाने ज्यूनियर' (Dance Deewane Junior) हा कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. लवकरच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. 'डान्स दीवाने ज्यूनियर' या कार्यक्रमात नीतू कपूर, नोरा फतेही आणि मर्जी पेस्तोनजी परीक्षकाच्या भूमिकेत होते.  'डान्स दीवाने ज्यूनियर'च्या महाअंतिम सोहळ्यात नीतू कपूर आणि रणबीर कपूरचा डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 


'डान्स दीवाने ज्यूनियर'च्या महाअंतिम सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना नीतू कपूरने एक खास घोषणा केली आहे. नीतू कपूरने 'डान्स दीवाने ज्यूनियर'च्या मंचावर जाहीर केले की, या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यात ती तिच्या लाडक्या लेकासोबत म्हणजेच रणबीर कपूरसोबत डान्स करणार आहे. 






रणबीरचा 'शमशेरा' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


'डान्स दीवाने ज्यूनियर'चा महाअंतिम सोहळा खास असणार आहे. कारण या सोहळ्यात 'शमशेरा'ची टीम हजेरी लावणार आहे. लवकरच रणबीर कपूरचा 'शमशेरा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करण मल्होत्राने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.


'शमशेरा'नंतर रणबीरचा 'ब्रम्हास्त्र' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ब्रम्हास्त्र'मध्ये रणबीरसोबत आलिया भट्टदेखील दिसून येणार आहे. या सिनेमाच्या गाण्यांनी, टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. त्यामुळे प्रेक्षक आता 'ब्रम्हास्त्र'ची प्रतीक्षा करत आहेत.


संबंधित बातम्या


Shamshera Song : 'शमशेरा' मधील 'फितूर' गाणं रिलीज; रणबीर आणि वाणीचा रोमँटिक अंदाज


Ranbir Kapoor Video : रणबीर कोणाला म्हणाला, 'तू होणार काका, तू होणार मामा'?, व्हिडीओ व्हायरल