Ranbir Kapoor Video : बॉलिवूडमधील प्रसिद्ध रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) लवकरच शमशेरा (Shamshera)हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या चित्रपटामध्ये रणबीरसोबतच वाणी कपूर (Vaani Kapoor)आणि संजय दत्त (Sanjay Dutt) हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 22 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रणबीर सध्या या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा रणबीरचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काही फोटोग्राफर्स रणबीरला शुभेच्छा देताना दिसत आहेत. 


27 जून रोजी आलियानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन चाहत्यांना गूडन्यूज दिली होती. लवकरच आलिया आणि रणबीर हे आई-बाबा होणार आहेत. आलिया आणि रणबीरच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. आता रणबीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये फोटोग्राफर्स हे रणबीरला शुभेच्छा देताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये फॉटोग्राफर्सला रणबीर म्हणतो,  'तू काका होणार, तू मामा होणार' तर रणबीर या वेळी अभिनेता रणवीर सिंहला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देतो. 


पाहा व्हिडीओ:






आलियाने रणबीरसोबतचा एक फोटो शेअर करून आनंदाच्या बातमीवर अभिनंदन करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. त्यांनी एका फोटो शेअर करत लिहिले की, 'इतके प्रेम मिळाल्याने मी भारावून गेले आहे. प्रत्येकाचे मेसेज वाचण्याचा प्रयत्न केला आणि मला एवढेच सांगायचे आहे की, तुमचे प्रेम आणि आशीर्वाद कायम ठेवा. हे सगळं खूप खास आहे. तुम्हा सर्वांचे आभार.' आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं 14 एप्रिल 2022 रोजी  लग्नगाठ बांधली. मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीमध्ये रणबीर आणि आलियाचा लग्न सोहळा पार पडला. 


हेही वाचा: