Bus Bai Bus : 'बस बाई बस' (Bus Bai Bus) या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. 29 जुलैपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'बस बाई बस' च्या पहिल्या एपिसोडमध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) या हजेरी लावणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेंचा फोटो पाहिल्यावर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 
प्रोमो व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सुप्रिया सुळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो दाखवण्यात येतो. या दोघांचा फोटो पाहिल्यावर सुप्रिया सुळेंनी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी यांचा फोटो पाहिल्यावर सुप्रिया सुळे गुजराती भाषेमध्ये बोलायला लागतात. तर एकनाथ शिंदे यांचा फोटो दाखवल्यावर  सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'मी घरातील लोकांना चिडवते की आता पवार विरुद्ध शिंदे कारण माझे वडील पवार आहेत आणि माझ्या आईचं माहेरचं आडनाव शिंदे.' तसेच 'पवार साहेबांच्या घरामध्ये महिलांचे राज्य चालते का पुरुषांचे?' असा प्रश्न देखील सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं सुप्रिया सुळे या काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


पाहा व्हिडीओ:






असा कार्यक्रम करायची इच्छा होतीच! : सुबोध भावे


'बस बाई बस' या कार्यकमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे करणार आहे. कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता व्यक्त करताना सुबोध म्हणाला, ‘मला काहीतरी वेगळं किंवा नवीन करायची इच्छा होती. संगीत किंवा नृत्यांच्या स्पर्धांमध्ये आत एकसुरीपणा यायला लागला आहे. मी याआधी अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आहे. पण, संवादाचा कार्यक्रम मी कधीच केला नव्हता आणि तो करायची माझी खूप इच्छा होती. त्यामुळे जेव्हा मला या कार्यक्रमाची संकल्पना कळली, तेव्हा मला ती खूप आवडली आणि त्वरित होकार दिला.’


हेही वाचा: