Bus Bai Bus : 'बस बाई बस' (Bus Bai Bus) या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) हे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. 29 जुलैपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमामध्ये अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि सुप्रिया सुळे  (Supriya Sule) यांनी हजेरी लावली होती. आता या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) यांनी देखील हजेरी लावली आहे. झी मराठीच्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला.


सुबोध भावे हे मेधा यांना विचारतात घरातल्या गृहिणीला देखील अभिनय करावा लागतो? यावर मेधा, हो असं उत्तर देतात. तर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका महिलेनं मेधा मांजरेकर यांना प्रश्न विचारला की,'नवऱ्याचा फोन चेक करता का कधी?' या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं, 'आता नाही करत'


आई-वडिलांचा फोटो पाहताच झाल्या भावूक
बस बाई बस या कार्यक्रमामध्ये मेधा मांजरेकारांना त्यांच्या आई-वडिलांचा फोटो दाखवण्यात आला. हा फोटो बघताच त्या भावूक झाल्या. फोटो पाहून त्या म्हणाल्या, 'माझ्या आई-वडिलांचे एका वर्षापूर्वी निधन झाले. नऊ महिन्याच्या अंतरानं ते गेले.' 






'बस बाई बस' या कार्यकमाचे आभिनेता सुबोध भावे करतात. सध्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  कार्यक्रमाबद्दलची सुबोधनं सांगितलं, ‘मला काहीतरी वेगळं किंवा नवीन करायची इच्छा होती. संगीत किंवा नृत्यांच्या स्पर्धांमध्ये आत एकसुरीपणा यायला लागला आहे. मी याआधी अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आहे. पण, संवादाचा कार्यक्रम मी कधीच केला नव्हता आणि तो करायची माझी खूप इच्छा होती. त्यामुळे जेव्हा मला या कार्यक्रमाची संकल्पना कळली, तेव्हा मला ती खूप आवडली आणि त्वरित होकार दिला.’ 


वाचा इतर बातम्या