Boss Mazi Ladachi : 'बॉस माझी लाडाची' (Boss Mazi Ladachi) मालिकेतील आजचा भाग खास असणार आहे. ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपले  स्थान निर्मान केले आहे. आजच्या भागात मिहिर बॉसची सही घेण्यासाठी बॉसच्या घरी जाणार आहे. 


मिहिरला काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर बॉसची सही घेणे गरजेचे आहे. पण बॉसच्या घरी पूजा असल्याने बॉस ऑफिसमध्ये जात नाही. मालिकेचा प्रोमो नुकताच आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये बॉसची आत्या बॉसला मिहिरला पूजेनिमित्ताने बॉसला घरी बोलवण्याचा सल्ला देते. त्यामुळे सहीसाठी मिहिर बॉसच्या घरी जाणार आहे.





मिहिरला मांजरांची अॅलर्जी असते पण बॉसकडे पर्शिअन मांजर आहे. मिहिरला मांजरांची अॅलर्जी असल्याचे त्याने बॉसला सांगितलेले नसल्याने मांजरीला पाहताच मिहिरच्या चेहऱ्यावरचा रंग बदलतो. बॉसला हे समजल्यानंतर बॉस मिहिरला सही देणार का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 


'बॉस माझी लाडाची' मालिकेत भाग्यश्री लिमये (Bhagyashree Limaye) आणि आयुष संजीव ( Aayush Sanjeev) मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत भाग्यश्री खडूस बॉसच्या भूमिकेत दिसत आहे. तर आयुष मिहिरच्या भूमिकेत आहे.    


संबंधित बातम्या


Jhund : 'झुंड'ला अनोख्या शुभेच्छा, सोलापुरात सिनेमागृहाबाहेर लावले नागराज मंजुळेंचे भलेमोठे पोस्टर


90s Actress On OTT : माधुरी दीक्षितपासून सुष्मिता सेनपर्यंत, 'या' 90 च्या दशकातील अभिनेत्रींचा ओटीटीवर जलवा


Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेचा आज विशेष भाग, यश नेहाला डिनरडेटवर नेणार


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha