Bola Jay Bhim : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सोनी मराठी वाहिनीवर एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'बोला जयभीम' (Bola Jay Bhim) असे या कार्यक्रमाचे नाव आहे. हा कार्यक्रम 10 एप्रिलला रविवारी संध्याकाळी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
'बोला जयभीम' या कार्यक्रमात बाबासाहेबांवरची अनेक गाणी शिंदे घराण्यातले प्रसिद्ध गायक गाणार आहेत. 'बोला जयभीम' या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच शिंदे घराण्यातल्या तिन्ही पिढ्या एकाच मंचावर आपली कला सादर करणार आहेत.
ज्येष्ठ गायक आनंद शिंदे,सगळ्यांचा लाडका गायक उत्कर्ष शिंदे आणि तिसर्या पिढीतील अल्हाद आदर्श शिंदे असे तीन पिढ्यांतील गायक आपल्या गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. शिंदे घराण्याच्या गाण्यांबरोबरच दर्जेदार नृत्यांचे सादरीकरणदेखील होणार आहे. बाबासाहेब आणि त्यांचे कार्य यांचा महिमा आजच्या तरुण पिढीपर्यंत 'बोला जयभीम' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.
संबंधित बातम्या
Sher Shivraj : अंगावर शहारे आणणाऱ्या 'शेर शिवराज'चे नवे पोस्टर प्रदर्शित
Mere Desh Ki Dharti : देश बदल रहा है! 'मेरे देश की धरती' सिनेमाचे पोस्टर आऊट
Ranbir-Alia Wedding : मुहूर्त ठरला! आलिया-रणबीर 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha