Bigg Boss Marathi Wild Card Contestant : बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन चांगलाच चर्चेत आहेत. पहिल्या दिवसापासून या शोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बिग बॉसच्या घरातील कल्लाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. घरात भांडण, वाद तर कुठे केमिस्ट्रीही पाहायला मिळत आहे. लवकरच बिग बॉसचा पाचवा आठवडा सुरु होणार आहे. त्याआधी बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड सदस्याची एन्ट्री होणार असल्याचं सांगितलं जात आहे.


बिग बॉस हा शो छोट्या पडद्यावरील मनोरंजनाचा बॉस आहे. हा शो पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात, प्रेक्षकांच्या मर्जीनुसारच, हा शो चालतो. आता शोचे निर्माते बिग बॉस मराठीमध्ये नवीन ट्वीस्ट आणण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. या आठवड्याच्या शेवटी बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड सदस्याची एन्ट्री होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फेमस आरजे वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय अभिजीत बिचुकले याच्या नावाचीही वाईल्ड कार्ड सदस्यासाठी  चर्चा आहे.


बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांची महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. अनेक जण सोशल मीडियावर सदस्यांना सपोर्ट करण्यासाठी व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करताना दिसतात. आरजे सुमित हाही इंस्टाग्रामवर बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांसंदर्भातील व्हिडीओ पोस्ट करतो. सुमित आरजे म्हणजेच रेडिओ जॉकी आहे. यामुळे नेटकऱ्यांनी आरजे सुमितला बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून जाण्याबाबत सुचवलं. त्यानंतर सुमितनेही बिग बॉस मराठी घरात जाण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर बिग बॉस मराठीच्या घरात आरजे सुमितची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असं सांगितलं जातं आहे.






दुसरीकडे, बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या सुरुवातीपासून अभिजीत बिचुकले यांचं नाव चर्चेत होतं. अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून एन्ट्री घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. 


याशिवाय बिग बॉस मराठीच्या घरात निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांची दादागिरी पाहता, त्यांना टक्कर देण्यासाठी राखी सावंत हिला बिग बॉसच्या घरात आणा, अशी मागणी बिग बॉसप्रेमींकडून होताना दिसत आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून राखी सावंत हिचं नावही चर्चेत आहे.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Shraddha Kapoor : स्त्री 2 चित्रपटानंतर जगभरात श्रद्धा कपूरचीच जादू, प्रियंका चोप्राला टाकलं मागे; फॉलोअर्सच्या बाबतीत रचला नवा विक्रम