Bigg Boss Marathi Grand Finale : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा फिनाले आठवडा सुरु आहे. लवकरच यंदाच्या सीझनचा विजेता मिळणार आहे. त्यासाठी बिग प्रेमी जनता आपल्या लाडक्या सदस्याला पाठिंबा देताना दिसत आहे. फक्त महाराष्ट्रातील जनताच नव्हे, तर सेलिब्रिटी आणि राजकारणी देखील आपल्या लाडक्या सदस्याला सपोर्ट करत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्या लाडक्या सदस्याला पाठिंबा देत जनतेला त्याच्यासाठी व्होट करण्याचं आवाहन केलं आहे.
'गुलिगत सूरज'ला सुप्रिया ताई अन् दादांचा फुल्ल पाठिंबा
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सूरज चव्हाण विजेता व्हावा, अशी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांचीही इच्छा आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन सूरज चव्हाणचा फोटो शेअर करत त्याच्यासाठी व्होट अपिल केलं आहे. मुळचा बारामतीचा असणारा सूरज चव्हाण छोट्याशा गावातून थेट टेलिव्हिजनवर झळकत नाव कमावत आहे. यासाठी त्याला सबंध बारामतीकरांचा पाठिंबा मिळत आहे. याच बारामतीकर सूरज चव्हाणच्या सपोर्टसाठी आता सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचा नातू युगेंद्र पवार यांनी खास फेसबुक पोस्ट केली आहे.
बारामतीकर सूरज चव्हाणला व्होट करण्याचं आवाहन
सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवार यांची पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय, आपल्या बारामती तालुक्यातील मोढवे गावचा सुपुत्र, प्रसिद्ध रिल्सस्टार सुरज चव्हाण बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालतोय. देशभर त्यांची क्रेझ वाढली आहे. बिग बॉस सारख्या अवघड रिॲलिटी शोमध्ये 274 लोकांमधून अंतिम 16 मध्ये त्याची निवड झाली, हि आपल्या बारामतीसह अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या अतिशय व्यस्त दिनक्रमातून केवळ दोन मिनिटांचा वेळ काढून आपल्या लाडक्या सुरज चव्हाण यास वोट करून महाविजेता करण्यासाठी आपले योगदान देऊयात. त्यासाठी जिओ सिनेमा अप्लिकेशन इंस्टॉल करुन बिग बॉस मराठी या टॅबवर जाऊन व्होट नाऊ (Vote Now) वर गेल्यावर सूरजच्या फोटोवर टच करुन आपलं वोट सबमिट करा, हि विनंती.
अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनीही इंस्टाग्रामवर
बिग बॉस मराठीचा अंतिम टप्पा आता जवळ आला आहे! आपल्या सर्वांच्या आवडत्या बारामतीकर सुरज चव्हाणला जिंकवण्यासाठी आता फक्त काही दिवस उरले आहेत. त्याच्या कलेने आणि जिद्दीने त्याने आपल्या सर्वांच्या हृदयात खास जागा मिळवली आहे. चला, एकत्र येऊन सुरजला VOTE करूया आणि बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकुन आणुया!
महत्त्वाच्या इतर बातम्या :