Bigg Boss Marathi Season 5 : मागील चार सीझन 100 दिवस कल्ला करणारा बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi New Season) हा शो जवळपास दोन वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला. अगदी सुरुवातीपासूनच या खेळाचं स्वरुप, स्पर्धकांची निवड इतकच नव्हे तर बिग बॉसचा होस्ट सगळंच बदललं. त्यामुळे या खेळात दिवसागणिक नवनवीन ट्विस्ट येत होते. त्यातच आता एक मोठा ट्विस्ट या बिग बॉसच्या खेळात येणार आहे. 


शंभर दिवस राडे घालणारा हा शो पाचव्या सीझनमध्ये मात्र फक्त 70 दिवसांचाच असणार असल्याची चर्चा मागील अनेक दिवासंपासून सुरु होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण बिग बॉस 70 दिवसांतच त्यांचा खेळ संपवणार असल्याची अधिकृत माहिती सध्या समोर आली आहे. चॅनलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमत फिल्मीला यासंदर्भात अधिकृत माहिती दिली. 


 बिग बॉस घेणार निरोप....


लोकमत फिल्मीला चॅनलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉसचा हा सीझन येत्या काही दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याचप्रमाणे हा खेळ 100 नाही तर 70 दिवसांचा असेल. याबाबत अधिकृत घोषणा होणं अद्याप बाकी आहे.


'या' दिवशी पार पडणार ग्रँड फिनाले?


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये म्हटलंय की, बिग बॉस मराठी सीझन 5ची फायनल 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यावर अनेकांनी कमेंट्स त्यांना फायनलमध्ये कोणाला पाहायला आवडेल त्यांची नावं कमेंट्समध्ये टाकली आहेत.    


बिग बॉसच्या घरात सध्या वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक राहिले आहेत. त्यामुळे आता यापैकी कोण फायनलचं तिकीट मिळवणार आणि कुणाला घरची वाट दाखवली जाणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.                                              






ही बातमी वाचा : 


Bigg Boss Marathi Season 5 : शंभर दिवसांचा खेळ 70 दिवसांतच आटोपणार? सोशल मीडियावर बिग बॉसच्या ग्रँड फिनालेच्या तारखेची चर्चा