Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi New Season) हा आठवडा खूपच कठीण होता. या आठवड्यातील सर्व टास्क सदस्यांना हादरवणारे होते. आज बिग बॉस मराठीच्या घरात एलिमिनेशन पार पडणार आहे. या एलिमिनेशनमध्ये काय होणार हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. या आठवड्यात पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सात सदस्यांपैकी कोणाचा प्रवास आज संपणार हे पाहावे लागेल.


बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात कोण राहणार आणि कोणाचा खेळ संपणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणत आहे,"आता होणार आहे एलिमिनेशन. ज्यांना मोदक मिळतील ते सेफ होतील. ज्यांना नारळ मिळणार ते या घरातून निरोप घेणार". त्यानंतर घरातील एका सदस्यांला रितेश भाऊ म्हणतोय,"तुमचा प्रवास आज इथे संपतोय".


'हे' सदस्य बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट


'बिग बॉस'च्या घरात आज एलिमिनेशन होणार आहे. यात कोणाला मोदक मिळणार आणि कोणाला नारळ मिळणार हे जाणून घेण्यास बिग बॉसप्रेमी उत्सुक आहेत. घन:श्याम दरवडे, निक्की तांबोळी, आर्या जाधव, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अरबाज पटेल या सात जणांमधून एकाचा प्रवास आज संपणार आहे.


भाऊच्या धक्क्यावर सूरजचं कौतुक 


आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ कॅप्टन सूरजचं अभिनंदन करणार आहे. त्यावर सूरज म्हणतोय,"गणपती बाप्पा आणि माझ्या टीमने माझी इच्छा पूर्ण केली आहे. माझ्या टीमच्या पाठिंब्यामुळे मी कॅप्टन झालो आहे". त्यावर सूरजला सल्ला देत रितेश भाऊ म्हणतो,"सूरज या कॅप्टन पदाचा कॉन्फिडन्स घ्या. या आठवड्यात जसं बोलत होतात तसं बोलत राहा... काम करत राहा..स्टँड घ्या. कॅप्टन म्हणजे जबाबदारी आहे". 


असा माणूस मी आयुष्यात कधी पाहिला नाही - अभिजीत सावंत


अरबाजच्या पलटी मारण्यावर अभिजीत म्हणाला,"अरबाज पलटी मारणार यावर माझा विश्वास होताच. पण इतकी मोठी पलटी अशा पद्धतीने तो मारेल याबद्दल जरा वाईट वाटलं. घरातील सर्व सदस्यांचा त्याने विश्वासघात केला आहे. जान्हवीने त्याला किती सांभाळलं आहे. त्याच्यासाठी वैभवने निक्कीला सुनावलं होतं की,"काहीही झालं तरी मला बोल पण त्याला काही बोलू नको. त्याच्याजवळ जाऊ नको आणि क्षणातच अशा पद्धतीने फिरणारा माणूस मी आयुष्यात कधीही पाहिला नाही".  






ही बातमी वाचा :


Deepika Padukone Hospitalised: गणरायाच्या आशीर्वादाने येणार चिमुकला पाहुणा, दीपिका पादुकोण मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल