Bigg Boss Marathi Season 5 : आज घराघरांत गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यामुळे आज भाऊचा धक्काही (Bhaucha Dhakka) गणपती स्पेशल असणार आहे. आज सगळीकडे आनंदीआनंद आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाने कुटुंब एकत्र येत असतं. वेगवेगळ्या स्वभावाचे लोक एकत्र येतात. 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi New Season) घरातही वेगवेगळ्या स्वभावाचे लोक एकत्र आले आहेत. आजच्या भागात कॅप्टन सूरज बाप्पाचे आभार मानताना दिसणार आहे. तर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख त्याला खास सल्ला देणार आहे.


आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ कॅप्टन सूरजचं अभिनंदन करणार आहे. त्यावर सूरज म्हणतोय,"गणपती बाप्पा आणि माझ्या टीमने माझी इच्छा पूर्ण केली आहे. माझ्या टीमच्या पाठिंब्यामुळे मी कॅप्टन झालो आहे". त्यावर सूरजला सल्ला देत रितेश भाऊ म्हणतो,"सूरज या कॅप्टन पदाचा कॉन्फिडन्स घ्या. या आठवड्यात जसं बोलत होतात तसं बोलत राहा... काम करत राहा..स्टँड घ्या. कॅप्टन म्हणजे जबाबदारी आहे". 


'बिग बॉस मराठी'च्या घराचा कॅप्टन सूरज झाल्याने सर्वत्र आनंदीआनंद आहे. नेटकऱ्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आजच्या भागात रितेश भाऊदेखील सूरजचं कौतुक करताना आणि त्याला आत्मविश्वास देताना दिसणार आहे.






असा माणूस मी आयुष्यात कधी पाहिला नाही - अभिजीत सावंत


अरबाजच्या पलटी मारण्यावर अभिजीत म्हणाला,"अरबाज पलटी मारणार यावर माझा विश्वास होताच. पण इतकी मोठी पलटी अशा पद्धतीने तो मारेल याबद्दल जरा वाईट वाटलं. घरातील सर्व सदस्यांचा त्याने विश्वासघात केला आहे. जान्हवीने त्याला किती सांभाळलं आहे. त्याच्यासाठी वैभवने निक्कीला सुनावलं होतं की,"काहीही झालं तरी मला बोल पण त्याला काही बोलू नको. त्याच्याजवळ जाऊ नको आणि क्षणातच अशा पद्धतीने फिरणारा माणूस मी आयुष्यात कधीही पाहिला नाही".                          


ही बातमी वाचा : 


Bageshwar Dham : बागेश्वर बाबा यांच्याशिवाय नसतं झालं अनंत अंबानीचं लग्न? अंबानींच्या स्पेशल विमानातून धीरेन शास्त्रींचा ऑस्ट्रेलिया टू मुंबई प्रवास


Bhaucha Dhakka : 'असा माणूस मी आयुष्यात पाहिलेला नाही', भाऊच्या धक्क्यावर अभिजीतने मांडलं रोखठोक मत