Bigg Boss Marathi Season 5 Updates : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनला (Bigg Boss Marathi Season 5) रविवारपासून सुरुवात झाली आहे. यंदाच्या सीझनमध्ये दमदार स्पर्धकांचा सहभाग आहे. यंदाच्या सीझनचं होस्टिंग रितेश देशमुख करत आहे. रितेश देशमुखने बिग बॉसच्या पाचव्या सीझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये आपली छाप सोडली. बिग बॉसच्या घरात विजेता ठरण्यासाठी, टास्क जिंकण्यासाठी शह-कटशह, ठस्सनही जोरात असणार आहे. याची झलक ग्रँड प्रीमियरच्या एपिसोडमध्ये दिसून आली. 


'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनसाठी ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यानंतर सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर  अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar)  आणि रमा राघव फेम अभिनेता निखिल दामले यांची एन्ट्री झाली. होस्ट रितेश देशमुखने या दोघांशी संवाद साधला. यावेळी दोघांमध्ये वादाची ठिणगी दिसून आली. 






काय झालं नेमकं?


अंकिता वालावलकर आणि निखिल दामले यांच्या एन्ट्रीनंतर रितेशने निखिलला प्रश्न करत अभिनेते, कलाकार आणि इन्फ्लूएन्सर यांच्या वादाबाबत छेडले. त्यावर निखिलने इन्फ्लूएन्सर हे कलाकार नाहीत असे मत मांडले. सोशल मीडियाच्या फॉलोअर्सच्या संख्येवरून इन्फ्लूएन्सर हे अभिनेत्यांची कामे मिळवत असल्याचे म्हटले. कलाकार म्हणून घडण्यास बरीच मेहनत असल्याचा मुद्दा निखिलने उपस्थित केला. तर, दुसरीकडे अंकिता वालावलकर हिने सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर हा देखील एक कलाकार असल्याचे म्हटले. आम्हाला आमचा एका ऑडिंयन्स असतो आणि त्यासाठी कोणता कंटेंट हवाय,यानुसार आम्ही  काम करतो असे तिने म्हटले. यावरून  दोघांमध्ये झालेल्या वादाने बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरचे वातावरण चांगलेच तापले. अखेर रितेश देशमुखने सफाईने विषयाला थांबवत शो पुढे नेला.


सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरची एन्ट्री...


यंदाच्या बिग बॉस मराठीच्या सीझनमध्ये चार सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहेत. यामध्ये अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण आणि घनश्याम दराडे यांचा समावेश आहे. आता, ग्रँड प्रीमियरलाच कलाकार विरुद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर असा वाद झाल्याने बिग बॉसच्या घरात काय होणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 


इतर संबंधित बातमी: