Bigg Boss Marathi Contestant List : बहुप्रतिक्षित बिग बॉसच्या नव्या सिझनला (Bigg Boss Marathi Season 5) आता सुरुवात झाली आहे. या सिझनमध्ये काय गाजणार, काय धम्माल होणार, कोण राडा घालणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पुढचे शंभर दिवस प्रेक्षकांना मिळत जाणार आहेत. त्यातच घरात दाखल झालेल्या स्पर्धकांची रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) शाळा घेताना पाहायला मिळेल. त्यामुळे यंदाचा हा सिझन रितेशच्या स्टाईलने गाजणार आहे. 


दरम्यान रविवार 28 जुलै रोजी बिग बॉसचा ग्रँड प्रिमिअर पार पडला. या ग्रँड प्रिमिअरमध्ये मागचे काही दिवस प्रेक्षकांची जी उत्सुकता होती की बिग बॉसच्या घरात कोण दाखल होणार याची उत्सुकता अखेर संपली आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात जे स्पर्धक दाखल झालेत, त्यांच्यात आता पुढचे 100 दिवस एक खेळ रंगणार आहे. बिग बॉसच्या घरात दाखल झालेल्या स्पर्धकांची संपूर्ण यादी जाणून घेऊयात. 


बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची नावे


वर्षा उसगांवकर
निखिल दामले 
अंकिता वालावलकर 
पंढरीनाथ कांबळे 
योगिता चव्हाण 
जान्हवी किल्लेकर
अभिजित सावंत 
घनश्याम दराडे 
इराना रुडाकोवा
निक्की तांबोळी 
वैभव चव्हाण
अरबाज पटेल 
आर्या जाधव
पुरुषोत्तम पाटील - कीर्तनकार
धनंजय पोवार 
सूरज चव्हाण


चक्रव्यूहात स्पर्धक अडकणार? 


बिग बॉसच्या घरात यंदा चक्रव्यूह थीम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धक आता चक्रव्यूहात अडकणार की त्यांना ते भेदता येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे घरात जातानाच बिग बॉसच्या चक्रव्यूहाची सुरुवात करण्यात आली. बिग बॉसच्या घरात एक डिलेमा ठेवण्यात आला होता. त्यामध्ये स्पर्धकांची एक गरजेची गोष्ट आणि दुसरीकडे बिग बॉसची करन्सी ठेवण्यात आली. यातील अनेक स्पर्धकांनी करन्सी घेतली तर काहींनी त्यांना हवी असलेली गोष्ट घेतली. त्यामुळे आता घरात कोणती रंगत येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


प्रत्येक आठवड्यात झटका आणि मनोरंजनाचा धमाका


प्रत्येक आठवड्यात लागेल  झटका, आणि रंगणार मनोरंजनाचा धमाका. अशक्य अशा गोष्टींनी बनलेला 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी आता सज्ज आहे. घरातील मजा, मस्ती, डाव , प्रतिडाव आणि नव्या होस्टची कमाल अशा साऱ्याच गोष्टी पाहण्याची , अनुभवण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.                                                              
 


ही बातमी वाचा : 


Jahnavi Killekar : छोट्या पडद्यावरील खलनायिकेची बिग बॉसच्या घरात एन्ट्री, जान्हवी किल्लेकर काय नवा डाव टाकणार?