Bigg Boss Marathi Season 5 :  बिग बॉस मराठीमध्ये (Bigg Boss Marathi Season 5) नॉमिनेशनच्या टास्कची तोफ धडाडली. त्यामुळे यंदाच्या सीझनमधील 16 महारथी एकमेकांना नॉमिनेट करताना दिसणार आहेत. त्याचसाठी चौथ्या दिवशी घरात राडे आणि धमाका झाल्याचंही पाहायला मिळालं. यामध्ये अनेकजण दुसऱ्याला नॉमिनेट करण्यासाठी झटत होते. त्यातच छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडेची (Ghanashyam Darade) तोफ धडाडली. 


छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडेनी कोल्हापूरचा रांगडा गडी धनंजय पोवारला नॉमिनेट केलं आहे. यावेळी छोटा पुढारीने धनंजयला का नॉमिनेट केलं, याचं कारणही दिलं आहे. त्यामुळे एकमेकांविषयीचे नाराजीचे सूरही या नॉमिनेशनच्या टास्कमध्ये दिसणार आहे. 


घन:श्यामने दिलं धनंजयला नॉमिनेट करण्याच कारण


'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये घन:श्याम म्हणतोय,"सकाळी माझ्या शरीराचा जर डीपी दादाला हात लागला तर त्यांना वाटलं मला गुदगुल्या झाल्या. कॅमेऱ्यासमोर जाईल की महाराष्ट्राचा छोटा पुढारी गुदगुल्या करतो. मी डायरेक्ट डीपी दादाला नॉमिनेट करतोय". एकंदरीतच घन:श्यामची तोफ धडाडली असून त्याने थेट कोल्हापूरचा ढाण्या वाघ धनंजयलाच नॉमिनेट केलं आहे.  






'बिग बॉस मराठी'मध्ये स्पर्धकांना घरात टिकून राहण्यासाठी हुशारीने टास्क खेळावे लागतात. प्रीमियरपासूनच 'बिग बॉस'ने स्पर्धकांना पेचात पाडले आहे. 'बिग बॉस मराठी' सुरू होऊन चार दिवस पूर्ण झाले असून चौथ्या दिवशीच घरात पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. नॉमिनेशनची तोफ असं या टास्कचं नाव आहे.  'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील 16 सदस्य आपल्या स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत.                                                                                                                         


ही बातमी वाचा : 


'हिला हाकलून द्या, निक्की दुसरी राखी सावंत'; वर्षा उसगांवकर, आर्या अन् अंकिताशी नडली, नेटकऱ्यांनी चांगलीच झापली