Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्या राड्याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली. निक्कीने वापरलेल्या शब्दांवर रितेशने देखील भाऊच्या धक्क्यावर तिची चांगलीच शाळा घेतली. पण त्यानंतरही रितेशने दिलेल्या टास्कमध्ये निक्कीने वर्षा उसगांवकरांना गुडघ्यात मेंदू हे लेबल दिलं. त्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी निक्कीला चांगलच झापल्याचंही पाहायला मिळालं. 


'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा पहिला आठवडा निक्की तांबोळीने चांगलाच गाजवला. 'बिग बॉस मराठी'च्या घराला कंट्रोल करताना निक्की दिसून आली. आपल्या हिंमतीने आणि डोक्याने तिने अनेक गोष्टी केल्या. पण मुद्दा बरोबर असला तरी तिची भाषा चुकीची होती. त्यामुळे रितेश भाऊ त्याच्या 'भाऊच्या धक्क्या'वर तिचा माज उतरवणार आहे.


निक्कीचा वर्षाताईंवर पुन्हा निशाणा


बिग बॉसच्या घरात एक्सरेचा टास्क देण्यात आला. त्यामध्ये जे पोस्टर येईल त्यावर जे चित्र आहे, ते घरातील सदस्याला द्यायचं. निक्कीने जेव्हा ते चित्र निवडलं तेव्हा ते गुडघ्यात मेंदू असं होतं. त्यावर निक्की म्हणते की, मला ते एका व्यक्तीला द्यायचं आहे, पण पुन्हा सगळे म्हणतील की मी अनादर करते म्हणून. त्यामुळे मला असं हे कोणाला द्यायचं नाही. त्यावर रितेश तिला म्हणतो की, तू गेम ओपनली खेळ. तेव्हा निक्की तो गुडघ्यात मेंदू हे लेबल वर्षा उसगांवकर यांना देते. कारण असं नाहीये की, मला त्यांचा अनादर करायचा आहे, पण बऱ्याचदा त्या अनेक गोष्टी उगाच ताणतात. त्यामुळे मला असं वाटतं की, त्यांच्या गुडघ्यात मेंदू आहे.  


वर्षा-निक्कीचा वाद


बिग बॉस जेव्हा सांगतात की, आता बेडचा वापर करायला परवानगी नाही. तेव्हा वर्षा उसगांवकर या बिग बॉसला म्हणतात की, चुकून झालं. त्यावर निक्की भडकते आणि ती म्हणते आता आम्हाला भोगावं लागतंय ना. तुमच्यामुळे आम्हाला जमीनीवर झोपावं लागतंय. त्यावर वर्षा उसगांवकर तिला म्हणतात की, माझ्या एकटीमुळे झोपावं नाही लागत आहे. जेव्हा तुम्ही झोपला होता, तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? निक्कीला वर्षा उसगांवकर म्हणतात की, ओरडू नकोस, त्यावर निक्कीही म्हणते की, तुम्ही शांत बसा. 






ही बातमी वाचा : 


Bigg Boss Marathi Season 5 : 'रुपानं देखणी, सुपारी चिकणी'; कोल्हापूरच्या वाघानं रशियन इरीनाला लावलं मराठीचं वेड