Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनमध्ये (Bigg Boss Marathi Season 5) प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच सरप्राईजेस मिळत आहे. त्यातच घरातील काही स्पर्धकांच्या एन्ट्री देखील प्रेक्षकांची सरप्राईजच होत्या. घरात धनंजय पोवर आणि सूरज चव्हाणच्या (Suraj Chavan) एन्ट्रीने सगळ्यांनाच धक्का बसला. गुलीगत व्हिडीओ म्हणून टिक टॉकवर फेमस झालेल्या सूरजला बिग बॉसच्या घरात पाहून सगळ्यांनाच आनंद झाला. 


सूरज हा टीक टॉकच्या माध्यमातून सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला होता. पण बऱ्याचदा त्याच्या व्हिडीओवर ट्रोलिंग देखील केलं जायचं. बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी जेव्हा सूरजने त्याच्या परिस्थितीविषयी सांगितलं तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. त्यातच आता त्याच्या कुटुंबियांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. दरम्यान सूरजच्या या यशावर त्याच्या कुटुंबियांना सार्थ अभिमान आहे.           


'ट्रोल करणाऱ्यांची आता त्यानं तोंडं बंद केलीत'


जाहीर सभा या युट्युब चॅनलला सूरजच्या आत्या आणि बहिणीने मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या लेकाच्या यशाविषयी भरभरुन कौतुक केलं. त्याचप्रमाणे त्यांनी ट्रोल करणाऱ्यांना देखील चांगलंच उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. ट्रोल करण्यांविषयी बोलताना त्याच्या बहिणीने म्हटलं की, सूरजच्या व्हिडीओवर जेव्हा घाण घाण कमेंट्स यायच्या तेव्हा तो म्हणायचा की,मला काही वाचता येत नाही. त्यामुळे कमेंट्सकडे आपण लक्ष द्यायचं नाही. कमेंट करणारे कमेंट करतच राहतात. पण आता त्याच कमेंट करणाऱ्यांच्या तोंडावर त्याने चप्पल मारली आहे. कारण त्याला सुरुवातीला खूप घाण घाण कमेंट्स यायच्या, तरीही त्याने हसवायचं सोडलं नाही. 


बिग बॉसच्या घरात गेल्यानंतरही सूरजला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावर त्याच्या बहिणीने म्हटलं की, गरीबांनी मोठं व्हायचंच नाही का? म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी फक्त मोठीच लोकं पाहायची आहेत का, गरीबीतून एखादा मोठा होतोय, हे तुम्हाला बघवत नाहीये का? असाही सवाल उपस्थित केला. 


सूरजचा स्वभाव कसा


त्याच्या बहिणीने सूरजच्या स्वभाविषयी बोलताना म्हटलं की, त्याला राग लगेच येतो. म्हणजे एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नाही, तर त्याची चिडचिड होते.  त्याला सुरुवातीला तो खेळ कळतच नव्हता, म्हणून त्याची तशी प्रतिक्रिया येत होती. 


ही बातमी वाचा : 


Bigg Boss Marathi Season 5 : मराठी अभिनेत्रीचा निक्की तांबोळीला फुल्ल सपोर्ट, वर्षा उसगांवकरांच्या वादावर म्हणाली, 'तुमचं वय घरी ठेवून...'