Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरातील सदस्य आता आपला खेळ दाखवू लागले आहेत. यामुळे आता घरातील टास्कमध्ये चांगलीच चुरस निर्माण होऊ लागली आहे. बिग बॉसने बीबी करन्सीसाठी मानकाप्या भूताच्या पाताळलोकातून सोन्याची नाणी आणायची होती. आता टास्कनंतर घराचा कॅप्टन निवडण्यात येणार आहे. या निवडीमध्ये आता मोठा ट्वीस्ट आला आहे.
मानकाप्या भूताच्या पाताळलोकातून सोन्याची नाणी आणण्याच्या टास्कमध्ये ग्रुप बी विजयी झाली. त्यानंतर बिग बॉसने विजयी झालेल्या ग्रुपला पराभूत झालेल्या ग्रुप ए मधील दोन जोड्यांना कॅप्टन्सीच्या रेसमधून बाहेर काढण्यास सांगितले. त्यानुसार ग्रुप बी ने पॅडी कांबळे-घन:श्याम आणि निक्की-अभिजीत यांना आपल्या विशेषाधिकाराने बाहेर काढले.
कॅप्टनसीच्या रेसमध्ये आला ट्वीस्ट
कॅप्टनसीच्या रेसमध्ये कोण विजेता होणार आणि कॅप्टनसी मिळवण्यासाठी कोण कोणाला फेव्हर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.'बिग बॉस मराठी'चा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य कॅप्टनसी टास्क खेळताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,"आता वेळ आहे नवा कॅप्टन निवडण्याची". त्यानंतर घरातील इतर सदस्य म्हणजेच जान्हवी, अंकिता आणि सूरज हे कॅप्टन पदासाठी का योग्य आहेत हे सांगताना दिसत आहेत. घरातील नव्या कॅप्टनसाठी बहुमत असणे आवश्यक आहे. पण त्यांच्यात बहुमत होत नसल्याने बिग बॉस बाहेर बसलेल्या सदस्यांना नवा कॅप्टन निवडण्यास सांगतात. त्यामुळे घराचा नव्या कॅप्टन कोण असणार हे आता घराबाहेर बसलेले निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, पॅडी कांबळे, घन:श्याम सरोटे ठरवणार आहेत. मात्र, अरबाज पटेलला शिक्षा म्हणून बिग बॉसने आधीच अपात्र ठरवले होते. त्यामुळे आता घराचा नवा कॅप्टन ठरवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका ठरणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
अरबाजने केलं सूरजचं कौतुक
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात अरबाज सूरजचं कौतुक करताना दिसणार आहे. अरबाज सूरजचं कौतुक करत म्हणतोय,"आतमध्ये तू खूप चांगलं बोललास. आजकाल खूप छान खेळत आहेस.. तुला कधी काही सल्ला हवा असेल तर मी कायम तुझ्यासाठी हजर असेन. माझ्याविरोधात गेला तरी आवडेल. एका भावाप्रमाणे मी कायम तुझ्यासोबत असेल. तुझा आजचा खेळ तर मला खूप आवडलाय, असे अरबाज सूरजला म्हणतो.