Bigg Boss Marathi Season 5 :  गेले महिनाभर 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi new season) घरातील निक्की आणि अरबाजची मैत्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली. पण भाऊच्या चक्रव्यूहात गेल्यावर निक्कीसमोर सत्य आलं आहे. सत्य समोर आल्यानंतर निक्की आणि अरबाजमध्ये चांगलाच दुरावा आला आहे. निक्की एकटी खेळेल असं वाटत असताना तिने अभिजीतसोबत हातमिळवणी केलेली आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.


दरम्यान दोन्ही ग्रुप्सना अभिजीत आणि निक्कीची मैत्री ही सुरुवातीपासून खटकत होती. त्याचप्रमाणे त्यांनी अनेकदा त्याबद्दल बोलूनही दाखवलं होतं. भाऊच्या धक्क्यावरही या गोष्टीची चर्चा झाली होती. पण त्यानंतरही घरातल्यांना या दोघांच्याही मैत्रीविषयी बरीच अडचण निर्माण होत होती. 


बिग बॉसच्या घरातली नवी जोडी


'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की आणि अभिजीत गप्पा मारताना दिसत आहेत. दरम्यान बिग बॉस म्हणतात,"अभिजीत जोडीत बांधले गेले आहात. या परिस्थितीवर कोणतं गाणं सुचतयं?". त्यावर अभिजीत म्हणतो,"हम दोनो". त्यानंतर घरात एकच हशा पिकतो.


नव्या जोडीवर घरातल्यांच्या प्रतिक्रिया


अभिजीतच्या गाण्यानंतर अंकिता म्हणते,"आज कळलं आम्हाला जोड्या बिग बॉसच्या घरात बांधलेल्या असतात". त्यावर अभिजीत 'कुछ तू लोग कहेंगे' हे गाणं म्हणतो. बिग बॉस मराठीचा आजचा भाग खूपच कमाल असणार आहे. घरातील सदस्य घाबरलेले असताना दुसरीकडे निक्की आणि अभिजीत सदस्यांना चांगलच हसवणार आहेत.


आर्या आणि जान्हवीचं निक्कीविषयी गॉसिप


आर्या जान्हवीला बोलते की, मी निक्कीला बोलली की, आता पॉसिबल आहे की तू  येवढ्या ठाम डिसिजनवर आली आहेस की, तुला आता जान्हवीसोबत नाही बोलायचे आहे. आताच तुझ्यामध्ये एवढा बदल होऊ शकतो. तर , तुझे जे खरे व्यक्तीमहत्व आता दिसू शकते." 


त्यावर जान्हवी म्हणाली की," माझा गेम आता पर्यंत एकदम क्लिअर होता. मी एकमेव अशी व्यक्ती आहे जी निक्कीच्या समोर भांडू शकते कचाकच. त्यावर आर्या म्हणते की," सगळे जण तूझी फक्त ॲक्शनच दाखवू शकतात की... जान्हवी काय आहे आणि सगळ्यांना हेच पाहायचे आहे." 






ही बातमी वाचा : 


Sharad Ponkshe : 'नथुराम गोडसेच्या भूमिकेला अखेरचा रामराम,' 26 वर्षांचा प्रवास संपला, शरद पोक्षेंची भावनिक पोस्ट