Sharad Ponkshe : प्रदीप दळवी लिखित विनय आपटे दिग्दर्शित 'मी नथुराम गोडसे बोलतोय' (Me Nathuram Godse Boltoy) या नाटकाचा पहिला प्रयोग 10 जुलै 1998 पार पडला होता. शरद पोंक्षे यांनी या नाटकात नथुराम गोडसेची भूमिका साकारत होते. शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी विनोदी, गंभीर, नायक, खलनायक अशा वेगवेगळ्या प्रकराच्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण त्यांना खरी पंसती ही नथुराम गोडसेच्या भूमिकेमुळे मिळाली. 


दरम्यान शरद पोंक्षे यांनी आता नथुराम गोडसेच्याही भूमिकेचा निरोप घेतला आहे. तब्बल 26 वर्षांनी शरद पोंक्षे यांनी नथुरामच्या भूमिकेचा निरोप घेतला. इकतच नव्हे तर त्यांनी त्यांच्या नव्या नाटकाची यावेळी घोषणा केली आहे. त्यामुळे आता एक नवं नाटक रंगभूमीवर लवकरच येणार आहे. 


शरद पोंक्षे यांची भावनिक पोस्ट


शरद पोंक्षे यांनी भावनिक पोस्ट करत म्हटलं की, आज सिएटल अमेरीकेत “नथुराम गोडसे “च्या भूमिकेला अखेरचा रामराम.10 जुलै 1998 ते 25 ऑगस्ट 2024 एवढ्या प्रदीर्घ प्रवासात रसिकांनी दिलेल्या अलोट प्रेमाबद्दल कायमच ऋणी आहे. आता नविन भूमिका नविन नाटक नोव्हे पासून सुरू “हिमालयाची सावली”


शरद पोंक्षे यांचं 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाचं लेखन प्रदीप दळवी (Pradeep Dalvi) यांनी केलं आहे. तर विनय आपटे (Vinay Apte) यांनी या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 1997 मध्ये या नाटकाला विरोध झाल्यानंतर 817 व्या प्रयोगानंतर हे नाटक बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर 'नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाच्या माध्यमातून स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा इतिहास रंगमंचावर नव्याने अवतरलं. वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर या नाटकाचे प्रयोग थांबवण्यात आले होते. त्यानंतर सहा वर्षांनी आता पुन्हा एकदा हे नाटक रंगभूमीवर आलं.                                                                                     






ही बातमी वाचा : 


Dharmaveer 2 : "असा हा धर्मवीर...." सुखविंदर सिंगच्या आवाजात  गाणं, आनंद दिघेंच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला