Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Live Updates : मरी आई पावली! सगळ्यांच्या बुक्कीत टेंगुळ, सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस' विजेता
Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Live Updates : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची ट्रॉफी कोण उचलणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
अपूर्वा जाधवLast Updated: 07 Oct 2024 01:02 PM

पार्श्वभूमी
Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Live Updates : जवळपास दोन वर्षांनंतर बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi New Season) हा खेळ रंगला होता. 28 जुलै 2024 रोजी बिग...More
Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Live Updates : जवळपास दोन वर्षांनंतर बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi New Season) हा खेळ रंगला होता. 28 जुलै 2024 रोजी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला सुरुवात झाली. पहिल्याच प्रोमोमध्ये रितेश भाऊंची एन्ट्री प्रेक्षकांना मोठा आश्चर्याचा धक्का देऊन गेली. त्यानंतर या घरात एकूण 16 स्पर्धक दाखल झाले होते. त्यानंतर आता केवळ सहाच स्पर्धकांनी ग्रँड फिनालेचा टप्पा सर केला आहे. त्यामुळे आता या सहा जणांपैकी कोण ट्रॉफी उचलणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. निक्की तांबोळी, अभिजीत जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि अंकिता वालावकर हे स्पर्धक बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेचे स्पर्धक आहे. त्यामुळे यांच्यापैकी ट्रॉफी कोण उचलणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागून राहिली आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकयोगिता चव्हाण, निखिल दामले, पुरुषोत्तम दादा पाटील, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोव्हा, वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, धनंजय दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, पंढरीनाथ कांबळे आणि जान्हवी किल्लेकर या 16 स्पर्धकांनी घरात प्रवेश केला होता. त्यानंतर एक एक करुन घरातील 10 स्पर्धकांनी घराचा निरोप घेतला. त्यानंतर संग्राम चौघुले याने घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री केली. पण वैद्यकीय कारणामुळे संग्रामला घराबाहेर जावं लागलं होतं. आर्याला बिग बॉसच्या घरातून काढलं दरम्यान आर्या जाधवला बिग बॉसच्या घरातून काढून टाकण्यात आलं होतं. कारण आर्याने बिग बॉसच्या घरात हात उगारत बिग बॉसच्या मूलभूत नियमांचं उल्लंघन केलं होतं. बिग बॉसच्या घरात हिंसा न करणं हा मूलभूत नियम आहे. पण याच नियमांचं आर्याने उल्लंघन करत निक्कीला कानशिलात लगावली होती. त्यानंतर आर्यावर कारवाई करत तिला बिग बॉसच्या घरातून हकलण्यात आलं होतं.
Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचं नेटकरी करतायत कौतुक
Big Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची सांगता दणक्यात झाली असून गेल्या 70 दिवसांपासून बिग बॉसच्या घरात रंगलेला खेळ संपला आहे. बिगबॉसच्या घरात ७० दिवस राहून परत आल्यावर टॉप ६ सदस्यांचं घरी जंगी स्वागत होतंय. जान्हवी किल्लेकर हिच्या घरच्यांनी केलेल्या तिच्या स्वागताचा व्हिडिओ आता चांगलाच गाजतोय. घरी परतल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी ढोल ताशाच्या गजरात तिचं स्वागत केलं. यावेळी जान्हवीनंही ठेका धरला होता.