Bigg Boss Marathi Season 5 Finalist : जुलै महिन्यांत तब्बल दोन वर्षांनी बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi New Season) खेळ सुरु झाला. राडे, भांडणं, टास्क या सगळ्याच गोष्टींमुळे यंदाच्या सीझनची बरीच चर्चा झाली. या सीझनमध्ये अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळे प्रेक्षकांमध्येही बिग बॉसचं वातावरण पाहायला मिळालं. त्यातच आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फानलिस्ट प्रेक्षकांना मिळाले आहेत. 


निक्की तांबोळी (Nikki Tamboli), अभिजीत सावंत (Abhijeet Sawant), धनंजय पोवार (Dhananjay Powar), सूरज चव्हाण (Suraj Chavan), जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar),  अंकिता वालावलकर हे टॉप 6 स्पर्धक बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फानलिस्ट ठरले आहेत. त्यामुळे आता या सहा जणांपैकी ट्रॉफी कोण उचलणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 


बिग बॉसच्या घरात हाऊस पार्टीचे आयोजन 


बिग बॉसच्या घरात आज स्पर्धकांसाठी हाऊस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मराठी वाजलंच पाहिजे ही टॅगलाईन घेऊन प्रसिद्ध झालेल्या डीजे क्रेटेक्सने हजेरी लावली. त्याच्या डीजेच्या तालावर घरातील स्पर्धकांनी ठेका धरला होता.                                             


क्रेटेक्सने घरातील प्रत्येक स्पर्धकासाठी विशेष गाणं वाजवलं. त्यावर घरातील प्रत्येक स्पर्धकाने ठेका धरला आणि त्यानंतर घरातील टॉप 6 स्पर्धक फायनलिस्ट ठरले. त्यामुळे आता यापैकी कोणत्या स्पर्धकांचं बिग बॉसची ट्रॉफी मिळवण्याचं स्वप्न पूर्ण होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. 


16 स्पर्धकांमध्ये रंगला खेळ 


तब्बल दोन वर्षांनी 28 जुलै रोजी बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रिमिअर पार पडला. जेव्हा या शोची अधिकृत घोषणा झाली त्याचवेळी प्रेक्षकांना एक मोठं सरप्राईज मिळालं. यावेळी या सीझनचं होस्टिंग हे रितेश देशमखने केलं. त्याचप्रमाणे त्याच्या भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांनी रितेशच्या स्टाईलने शाळा घेण्यात आली. त्यामुळे यंदाचा भाऊचा धक्काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळालं. आता येत्या 6 ऑक्टोबर रोजी या सीझनचा विजेता कोण होईल हे पाहायला मिळेल.                                                             


ही बातमी वाचा : 


Gunaratna Sadavarte सलमान खानशी पंगा घेणार, गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉसमध्ये एंट्री; पत्नीकडून खास गिफ्ट