Bigg Boss Marathi Season 5 Day 9 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील (Bigg Boss Marathi New Season) पहिला आठवडा सदस्यांनी चांगलाच गाजवला. पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर पडले. शोचा होस्ट रितेश देशमुखने 'भाऊच्या धक्क्या'वर घरातील सदस्यांना फैलावर घेत त्यांच्या चुका दाखवून दिल्या.त्यामुळे आता दुसऱ्या आठवड्यात घरातील सगळे सदस्य अॅक्टिव्ह मोडवर असणार आहेत. पहिल्या आठवड्यात शांत असणारे सदस्य आता भिडणार आहेत. गुलिगत सूरज चव्हाण (Suraj Chavan)  आता अॅक्टिव्ह झाला असून त्याचा आणि जान्हवी किल्लेकरचा (Jahnavi Killekar) जोरदार वाद झाला आहे. 


'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील दुसऱ्या आठवड्याचा पहिला प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी किल्लेकर आणि गोलीगत सूरज चव्हाण भांडताना दिसून येत आहेत. प्रोमोमध्ये जान्हवी म्हणतेय,"तुला काल काय चावी मिळाली का? आठवडाभर तर शांतच होतास ना. माझ्यासमोर शहानपणा करायचा नाही. किती फालतू आहे हा" असे जान्हवीने म्हटले. त्या त्यावर संतापलेल्या गुलिगत सूरजने जान्हवीला,"तू निघ... चल फूट" असंच थेट सुनावले. या दोघांचा वाद होत असताना घरातील इतर सदस्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.  


गुलिगत सूरज चव्हाण पहिल्या आठवड्यात खूपच शांत होता. बिग बॉस आणि होस्ट रितेश देशमुखने 'भाऊच्या धक्का'वर सूरजला शांत न राहता, कोणालाही न घाबरता खेळण्यास सांगितले. त्यावर मागील आठवड्यात खूप शांत होता, आता चावी मिळालीय का? असे जान्हवी सूरजला उद्देशून बोलते. त्यावर सूरज तिला सुनावतो. सूरजकडून सडेतोड उत्तर आल्याने जान्हवी आणखीच बिथरते आणि सूरज किती फालतू आहे, असे बोलते. त्यावर सूरज तिला चल निघ, फूट असे म्हणतो. जान्हवी सूरजच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रयत्नात असते. तर दोघांच्या मध्ये असलेली अंकिता जान्हवीला अडवण्याचा प्रयत्न करते. हा वाद नेमका कशावरुन झाला, कोणत्या कारणांनी झाला हे आजच्या एपिसोडमध्ये दिसून येईल. 






 पण आता हळूहळू तो आपले खरे रंग दाखवताना दिसून येईल. 'बिग बॉस मराठी'च्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने काही सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. त्यामुळे या आठवड्यात हे सदस्य कसा खेळ खेळणार? खेळ खेळताना एकमेकांसोबत कसे वागणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.


पहिल्याच आठवड्यात एलिमिनेशनचा वार


बिग बॉस मराठीच्या पहिल्याच आठवड्यात एलिमिनेशनचा वार झाला आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्याच आठवड्यात सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, धनंजय पोवार आणि किर्तनकार पुरुषोत्तम पाटील हे एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले होते. त्यापैकी किर्तनकार पुरुषोत्तम पाटील यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले.