Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Aarya Jadhav :  'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन (Bigg Boss Marathi New Season) चांगलाच धुमाकूळ घालत आहे. वीकेंडला पार पडलेला 'भाऊचा धक्का' चांगलाच गाजला आहे. आता या आठवड्यात सदस्य का धमाका करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. रविवारी झालेल्या 'भाऊच्या धक्क्या'नंतर निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आता एकटी पडली असल्याचे चित्र आहे. तर, याचा फायदा कोण घेणार, बिग बॉसच्या घरात एकटीच प्रवास पू्र्ण करणार का हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. 


भाऊच्या धक्क्यावर 'चक्रव्यू'मुळे (ChakraView) टीम ए मध्ये काहीसं तणावाचे वातावरण झाले आहे. आपल्या पाठिमागे सुरू असणारी निंदानालस्ती आणि होणारा कट पाहून निक्की दुखावली गेली आहे. तिने भाऊच्या धक्क्यावर टीम ए मधील सदस्यांना इशारा दिला आहे. आता काहीही झाले तरी ग्रुप ए मधील सदस्य यंदाच्या सीझनचा विजेता होणार नसल्याचा चंगच निक्कीने बांधला आहे.  रितेश देशमुखने शनिवारी जान्हवी किल्लेकरला तिच्या वर्तवणुकीमुळे तिला तुरुंगाची शिक्षा सुनावली आहे. तर, दुसरीकडे टीम ए मध्ये आर्या आणि अभिजीत यांचे जमत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर बिग बॉस मराठीच्या घरात आता पाचवा आठवडा सुरू होणार आहे. 


कलर्स मराठीने बिग बॉस मराठीच्या घरातील पाचव्या आठवड्यातील पहिला दिवसाचा प्रोमो समोर आणला आहे. या  प्रोमोमध्ये वैभव, आर्या, अरबाज, घन:श्याम हे सगळे जान्हवीला ठेवलेल्या जेलजवळ एकत्र येऊन गप्पा मारत असतात. त्यावेळी आर्या अरबाजला म्हणत आहे,"आता आपल्या सर्वांचा मेन दुष्मन एकच झालाय". त्यावर अरबाज निक्की असं उत्तर देतो. आर्या अरबाजला पुढे म्हणते,"विसरू नकोस". अरबाज म्हणतो,"निक्कीला खूप त्रास द्यायचाय". त्यावर आर्या म्हणते,"हो...पूर्णपणे". अरबाज पुढे म्हणतो,"तू अभिजीतला इतका त्रास दे तिला काही नाही होणार". तर, दुसरीकडे निक्की आणि आर्या बोलत असतात, त्यावेळी निक्की म्हणते की, मला या लोकांचा प्रचंड तिटकारा वाटत आहे. 






'बिग बॉस मराठी'चा आजचा भाग खूपच रंजक असणार आहे. हा आठवडादेखील निक्कीच गाजवणार असल्याचे दिसते. रविवारी, इरिना बाहेर पडल्यानंतर आता या आठवड्यात कोणता सदस्य बाहेर पडणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.